तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 20 March 2020

बीड जिल्ह्यातील सर्व आस्थापना आणि दुकाने 21 आणि 22 मार्च रोजी बंद - जिल्हाधिकारी राहुल रेखावार या बंद मधून अत्यावश्यक सेवांना वगळणार
 आज रात्री बारा वाजल्यापासून लागू होणार बंदचे आदेश

बीड, दि 20 :-कोरोना विषाणुचा संसर्ग  (कोव्हीड-19)  रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळून जिल्ह्यातील सर्व आस्थापना व दुकाने दिनांक 21 आणि 22 मार्च रोजी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
     या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी  मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पोलीस अधिक्षक, नगरपालिका, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सर्व उपविभागीय अधिकारी,  उपायुक्त, अन्न व औषध प्रशासन, सर्व तहसिलदार, सर्व संबंधीत नगरपालिका/नगरपंचायत मुख्याधिकारी, ग्रामसेवक, तलाठी इ.ची असणार आहे.
       अत्यावश्यक सेवा आणि आस्थापना म्हणजेच  शासकीय/निमशासकीय कार्यालये,पिण्याचे पाणी पुरवठा सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापना, सर्व बँका, दुरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्या आस्थापना, रस्ते वाहतूक व रेल्वे व्यवस्था, अन्न, भाजीपाला व किराणा पुरविणाऱ्या आस्थापना, दवाखाने, वैद्यकीय केंद्र व औषधी दुकाने, विद्युत पुरवठा, ऑईल व पेट्रोलियम व ऊर्जा संसाधने, प्रसार माध्यमे, मिडिया,                    अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आय.टी. आस्थापना वगळून सर्व आस्थापना 2 दिवस बंद राहतील.
        ह्या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंडसंहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल याची दक्षता घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment