तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 24 March 2020


·        31 मार्च 2020 पर्यंत असणार बंद
बुलडाणा, दि.24 : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी बुलडाणा विभागातील केवळ 9 डाक कार्यालय सुरू राहणार आहे. अन्य इतर सर्व उपडाकघर व शाखा डाकघर 31 मार्च 2020 पर्यंत बंद राहणार आहेत, याची ग्राहकांनी नोंद घ्यावी असे आवाहन अधिक्षक डाकघर, बुलडाणा यांनी केले आहे.

   या सुरू असलेल्या नऊ डाकघर कार्यालयांचे संपर्क क्रमांक देण्यात आलेले आहेत. या संपर्क क्रमांकावर ग्राहकांनी डाक विभागाच्या सेवेसाठी संपर्क करावा. सुरू असलेली नऊ डाकघरे संपर्क क्रमांकांसह पुढील प्रमाणे : बुलडाणा प्रधन डाकघर संपर्क क्रमांक 07262-242508, खामगांव प्रधान डाकघर संपर्क क्रमांक 07263- 252106, चिखली डाकघर संपर्क क्रमांक 07264-242061, देऊळगांव राजा डाकघर संपर्क क्रमांक 07261-232001, जळगांव जामोद डाकघर संपर्क क्रमांक 07266-221422, मलकापूर डाकघर संपर्क क्रमांक 07267-222001, मेहकर डाकघर संपर्क क्रमांक 07268-224522, नांदुरा डाकघर संपर्क क्रमांक 07265-221030, शेगांव डाकघर संपर्क क्रमांक 07265-252062 तरी ग्राहकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


जमील पठाण
8805381333

No comments:

Post a Comment