तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 24 March 2020

कोरोना च्या संसर्गामुळे न.प.ने रोगप्रतिबंधात्मक फवारणी त्वरित करावी―प्रा.विजय मुंडेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
कोरोना विषाणूंमुळे देशासह महाराष्ट्रात थैमान घातले असून नगरपालिकेने शहरात एक-दोन ठिकाणी रोगप्रतिबंधात्मक फवारणी केली आहे मात्र फवारणी सर्वत्र परळी शहरांमध्ये करणे गरजेचे आहे म्हणून या विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी नगरपालिकेने सर्वत्र परळी शहरात रोगप्रतिबंधात्मक फवारणी व स्वच्छता करावी अशी मागणी मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा विजय मुंडे यांनी केली आहे.


कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे देशासह संपूर्ण राज्यात थैमान घातले असून राज्य सरकारने कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपालिका प्रशासनाला आदेश दिले असून रोगप्रतिबंधात्मक फवारणी तसेच नालेसफाई न.प.ने परळी शहरात सर्वत्र करणे गरजेचे आहे.


      कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपालिकेने रोगप्रतिबंधात्मक फवारणी प्रत्येक वार्डात करणे गरजेचे आहे तसेच प्रत्येक वार्डातील व गल्लीतील नालेसफाई करणे सुद्धा गरजेचे असून त्यामुळे कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदतच होईल व स्वच्छता नांदेल राज्यात सध्या कोरोना च्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे ती वाढ सध्या 89 वर जाऊन पोहोचली आहे त्यामुळे स्वच्छतेवर लक्ष देणे हे नगरपालिकेची जबाबदारी आहे.


     या  पार्श्‍वभूमीवर परळी नगरपालिकेने स्वच्छतेवर लक्ष देऊन त्वरित रोगप्रतिबंधात्मक फवारणी करून वार्डातील तसेच गल्लीतील नाली सफाई त्वरित करावी त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव कमी होऊन स्वच्छता नांदेल तसेच रोगराई पसरणार नाही अशी मागणी मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा विजय मुंडे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment