तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 26 March 2020

कोरोनाच्या धास्तीने लिंबोटा येथे बाहेरून येणाऱ्यांनाची करणार आरोग्य तपासणी
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) देशभरात नागरिक कोरोना विषाणुच्या धास्तीने चिंताग्रस्त आहेत. याच कोरोनाच्या भितीपोटी बाहेरून येणाऱ्या लिंबोटा गावात प्रवेश करणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी करूनच गावात दाखल होणार असा निर्णय घेण्यात आला.

      परळी-बीड या राष्ट्रीय महामार्गावरील पांगरी गोपीनाथगड जवळ असणारे परळी तालुक्यातील लिंबोटा गाव आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहून गावातील नागरिक धास्तावले आहेत. शासनाने सगळीकडे संचारबंदी केली असून जिल्ह्यात 144 कलम लागू करण्यात आलेले आहे. मुंबई, पुणे या शहरात विषाणूचे बाधित रोज वाढत आहेत. परदेशातून, मुंबई, पुणे येथील लिंबोटाकर हे पुन्हा गावाकडे येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

     करोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी संपूर्ण देश आणि राज्य लाॅक डाउन करण्यात आले आहेत. कोरोनाची लागण ही गावात होऊ नये या दृष्टीने जिल्ह्यातील अनेक गावांनी गावच्या वेशीवर बॅरिगेट्स, कुंपण, खड्डे मारून बंद केल्या आहेत. गावात येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी करून  गावात सोडत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी लिंबोटा ग्रामपंचायतने घेतला निर्णय. तसेच कोरोनाच्या भयंकर रोगावर बचाव करण्यासाठी पुणे, मुंबई व इतर जिल्ह्यातून येणाऱ्या व जाणाऱ्या ग्रामस्थ नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयात नाव नोंदणी करावी अशी माहिती त्यांनी दिली आहे. तसेच जगभरात थैमान घातलेल्या कोरोना संक्रमित विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषधाची फवारणी ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावांमध्ये करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या वतीने सतर्क राहून, सर्वोतोपरी कोरोनाला पळवून लावण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. गावातील कोणतीही व्यक्ती घराच्या बाहेर पडणार नाही तसेच सार्वजनिक ठिकाणी लोक थांबणार नाहीत, आपल्या आरोग्य काळजी घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायत लिंबोटा यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment