तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 26 March 2020

जनतेला भाजी-पाला मिळण्यासाठी सहकार व पणन विभाग कार्यरत- ना.बाळासाहेब पाटील ; वाहतूक सुरळीत सुरु राहणार
 सातारा (प्रतिनिधी) :- करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने २१ दिवसांसाठी लॉकडाऊन जाहिर केलेला आहे.राज्यातील नागरिकांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तु तसेच भाजीपाला विनाअडथळा उपलब्ध होण्यासाठी सहकार व पणन विभाग कार्यरत आहे. नागरिकांनी यासाठी विनाकारण घराबाहेर पडू नये,असे आवाहन सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.मुंबई तसेच पुणे येथील बाजार समित्यांमध्ये मुबलक प्रमाणात भाजीपाला तसेच अन्नधान्याचे टेम्पो, ट्रक आलेले आहेत. सहकार व पणन विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला भाजीपाला मुबलक प्रमाणात मिळावा यासाठी काम सुरु आहे. गावांमध्ये, प्रभागांमध्ये भाजीपाला नेण्याची व्यवस्था करण्यात आली असून सुरक्षित अंतर ठेवून भाजीपाल्याची विक्री प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे, याला जनतेचाही चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे.

No comments:

Post a Comment