तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 20 March 2020

कोरोना च्या प्रतिबंधासाठी २२ मार्च रोजी जनतेने जनता कर्फ्यू दिवस पाळावा - खासदार हेमंत पाटील यांचे आवाहन

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हिंगोली :कोरोना रोगाच्या प्रतिबंधासाठी २२ मार्च रोजी केंद्र सरकारच्या वतीने जनता कर्फ्यू दिवस पाळण्याचे सांगण्यात आले असून या दिवशी हिंगोली लोकसभा मतदार संघातील जनतेने  कर्फ्यू दिवस पळून सहकार्य करण्याचे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे . 
                   कोरोना या महाभयंकर रोगाने जगात थैमान घातले असून आजवर शेकडो जणांना प्राण गमवावे लागले आहे. भारतात या रोगाचा प्रसार वाढू नये यासाठी खबरदारींचा उपाय म्हणून केंद्र आणि महाराष्ट्र राज्य सरकार अनेक उपाययोजना करत आहे . या रोगाला देशातील सर्व सामान्य जनतेने गांभीर्याने घेऊन अनावश्यक गोष्टी टाळाव्यात  जेणे करून या रोगाचा देशात प्रसार होणार नाही . देशाच्या दृष्टीने हि सर्वात  मोठी आपत्ती आहे. या आपत्तीचा सामना करण्यासाठी देशातील जनतेला २२ मार्च रोजी केंद्र सरकारने जनता  कर्फ्यू दिवस लागू केला आहे . त्यामुळे हिंगोली लोकसभा मतदार  संघातील म्हणजेच हिंगोली , नांदेड , यवतमाळ जिल्ह्यातील जनतेने या रोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन यावदिवशी स्वयंस्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा असेही  खासदार हेमंत पाटील म्हणाले . प्रतिबंधासाठी जनतेने सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊ नये गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये , हस्तादोलन टाळावे , या बाबी गांभीर्याने पाळल्यास नक्कीच रोगाचा प्रसार होण्यास प्रतिबंध बसेल असेही ते म्हणाले .राज्याचे  मुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख .उद्धवसाहेब ठाकरे व राज्याचे आरोग्यमंत्री, राजेश टोपे  यांनी राज्यात  अनेक उपाययोजना केल्या आहेत आणि काही निर्देश जारी केले आहेत त्यामुळे महाराष्ट्र्रात परिस्थिती नियंत्रणात आहे .  सरकारने येत्या ३१ मार्च पर्यंत सर्व सार्वजनिक ठिकाणे कार्यक्रम रद्द केले आहेत या सरकारच्या आवाहनाला जनतेने आजवर पाठिंबा दिला असून पुढेही असेच सहकार्य करावे असे हि खासदार हेमंत पाटील म्हणाले.

No comments:

Post a Comment