तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 24 March 2020

परळीत आदेशाचे पालन करणाऱ्या मोटारसायकल स्वरांना दिला पोलिसांनी चोप ; संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातसह बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात आज अनावश्यक काम नसताना व आदेशाचे पालन न करणाऱ्या मोटारसायकल स्वरांना पोलिसांनी दिला चोप देऊन कारवाई केली आहे. 

  कोरोना व्हायरस ला प्रतिबंध घालण्यासाठी तसेच एका पासून इतरांना त्याची लागण होऊ नये म्हणून शासनाने खबरदारी म्हणून आज पासून संचारबंदी सुरू झाली आहे. या मध्ये जीवन आवश्यक सेवा पुरवणाऱ्या तसेच ज्यांना अत्यावश्यक परिस्थितीत बाहेर पडावे लागत आहे असेच नागरिक बाहेर पडत आहेत मात्र काही हौशी मात्र विनाकारण आपल्या आरोग्याची व इतरांच्या आरोग्याची पर्वा न करणाऱ्या मोटारसायकल स्वार व रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात आली आहे.  संचारबंदीच्या अनुषंगाने मुख्य चौका चौकात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परळीतील अनेक रस्ते निर्मनुष्य असल्याचे चित्र दिसत आहे. काही ठिकाणी अपवाद वगळता रस्त्यावर उतरणाऱ्या व्यकतीवर पोलिस कारवाईचा बडगा उचलला होता. नागरिकांना 11 ते 3 या वेळेतच जिवानावश्यक वस्तू खरेदी करण्याचा आदेश असतांना नागरिक सकाळ पासूनच रस्त्यावर उतरल्यामुळे अनेकांना पोलीसांनी चांगलाच चोप दिला आहे.  परळी मोंढा परिसरात शुकशुकाट असून एखादी व्यक्ति आढळून आली तर तिला असा चोप देऊन पोलिसाच्या स्वाधीन केले. चोप दिल्याचा व्हडिओ मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे संचारबंदीची अनेकांनी धास्ती घेतल्याचे दिसत आहे.

No comments:

Post a Comment