तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 23 March 2020

वाशिम जिल्ह्यातील आरोग्य विभागाला कोरोना व्हायरस प्रतिबंधासाठी आवश्यक साहित्याकरिता निधी ऊपलब्ध


लवकरच साहित्य ऊपलब्ध होणार असल्याची जिल्हाधिकार्‍यांची माहीती

फुलचंद भगत यांच्या मागणीला यश


वाशिम-ज्या कोरोना आजाराने जगात थैमान घातले त्याची लाट भारतातही पसरली आणी सध्याच्या माहीतीनुसार सर्वात जास्त कोरोनाचे रुग्न महाराष्टात असल्याची माहीती प्राप्त झाली आहे.प्रशासन सर्वतोपरी या आजारावर मात करन्यासाठी प्रयत्न करीत आहे परंतु हे प्रयत्न करत असतांना माञ आरोग्य विभागालाच सवतीची वागणुक देत असल्याचे चीञ सध्या वाशिम जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे.या आजारातील रूग्नांवर ऊपचार,संशयीतावरील ऊपचार तसेच या आजारावरील तपासन्या याची संपुर्ण जबाबदारी आरोग्य विभागावर आहे.परंतु जे आरोग्य विभागाचे अधिकारी आणी कर्मचारी तसेच गावपातळीवरील आशा वर्कर्स यांनाच त्यांच्या सुरक्षतेची कुठलीही ऊपाययोजना केलेली दिसत नाही.परंतु राज्यशासनाने वाशिम जिल्ह्याला आरोग्य विभागासाठी कोरोना व्हायरसच्या बचावात्मक साहित्य खरेदीसाठी निधी ऊपलब्ध करुन दिला आहे,लवकरच साहित्य आरोग्य विभागांना पुरविन्यात येइल अशी माहीती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे यामुळे आरोग्य कर्मचार्‍यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.सध्या कोरोनाच्या भितीने चेकअप साठी आणी ऊपचारासाठी रूग्न दवाखान्यात गर्दी करतांना दिसत आहे.बाहेरगावावरुन आलेल्या लोकांनीही आपली तपासणी जवळच्या सरकारी दवाखान्यात करन्याच्या सुचना आहेत तसेच या कामी आरोग्य विभाग कमी पडणार नाही किंवा कुचराई करणार नाही असे सक्त आदेशही पारीत झाले आहेत.असे असतांना ईमानेईतबारे आरोग्य विभाग आपली सेवा देत असतांनाच त्यांनाच माञ दहशतीत जगावं लागत असल्याचं विदारक वास्तव आपल्या वाशिम जिल्ह्यात दिसत आहे.आरोग्य विभागातील कर्मचार्‍या सध्या मास्क,डिस्पोजल टपी,गाऊन ऊपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे त्यामुळे रुग्नापासुनच आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांनाच या कोरोनाचा धोका जास्त संभवतो कारण  तपासणीसाठी येणारे रुग्न रूग्नालयातच येतात.मग या आरोग्य विभागाच्या सुरक्षितेचे काय?असा प्रश्नही या ठिकाणी ऊपस्थीत होत आहे.एकीकडे जिल्हा परिषदेने आरोग्य यंञणेसाठी ऊपाययोजनेकरीता लाखो रुपये निधी मंजुर केलेला असतांना दुसरीकडे त्यांना मास्कही ऊपलब्ध नसणे ही शोकांतीका असल्याचे दिसत आहे.त्यामुळे कर्तव्यतत्पर असलेल्या जिल्हाधिकारी आणी ऊपजिल्हाधिकारी,आरोग्य विभागाचे वरिष्ठ यांनी ही बाब गंभिरतेने घेवुन आरोग्य कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातुन साहित्य ऊपलब्ध करुन देवून ठोस ऊपाययोजना  करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी प्रशासनाकडे केली होती.अखेर या मागणीला यश आले असुन लवकरच आरोग्य विभागांना साहित्य ऊपलब्ध होणार आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835,8450273206

No comments:

Post a Comment