तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 19 March 2020

फळा येथिल एकादशी निमित्य मोतीराम महाराज यांच्या समाधीचे दर्शन बंद

 आरूणा शर्मा
पालम तालूक्यातील फळा येथे एकादशी चे दर्शन बंद 
संस्थानचा निर्णय 
भाविकांनी न येण्याचे आव्हान
पालम तालुक्यातील फळा येथे एकादशीनिमित्त संत मोतीराम महाराज यांच्या समाधीचे दर्शन बंद राहणार आहे त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये असे आवाहन संस्थान व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आलेली आहे 
पालम तालुक्यातील फळा येथे वारकरी संप्रदायातील संत मोतीराम महाराज यांचे प्रसिद्ध मंदिर आहे याठिकाणी समाधीचे दर्शन घेण्यासाठी दर एकादशीला हजारो भाविक येत असतात शासनाने कोरोना प्रतिबंधासाठी गर्दी जमवू नये याकरिता आदेश दिलेले आहेत या ठिकाणी होणारी गर्दी पाहता संस्थांकडून दर्शन बंदचा निर्णय घेण्यात आलेला आहे 20 मार्च शुक्रवार रोजी एकादशी असून या दिवशी मंदिर दर्शनासाठी बंद केले जाणार आहे पहाटे केवळ पूजा-अर्चा करून मंदिर भाविकांसाठी बंद राहील त्यामुळे भाविकांनी फळा नगरीत येऊ नये असे आवाहन अध्यक्ष गिरधारीलाल काकाणी यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे

No comments:

Post a Comment