तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 21 March 2020

रुग्णसेवा युवा ग्रुपच्या वतीने कोरोना व्हायरस संदर्भात जनजागृती अभियान


विविध ठिकाणी 500 मास्क चे मोफत वितरण

फुलचंद भगत
वाशिम-रुग्णसेवा युवा ग्रुपच्या वतीने सर्व शासकीय नियमाच पालन करून जनजागृती कार्य सुरु आहे, प्रथम  आपल्या सदैव रक्षणात असणारे मंगरूळनाथ येथील पोलीस बांधव, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय या सर्व अधिकारी व कर्मचारी बांधव यांना मास्क वितरित केले व सोबतच हात स्वच्छ करण्यासाठी डेटॉल साबण सुद्धा देण्यात आले.
वरील सर्व शासकीय कर्मचारी हे आपल्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात तर एक सामाजिक बांधीलकि मनून त्यांच्या रक्षणाची जबाबदारी आपली आहे असे मत रुग्णसेवा युवा ग्रुप सदस्यांनी व्यक्त केले.
सोबतच पुणे, नागपूर हायवे वर कारंजा ते शेलूबाजार पर्यंत असणाऱ्या सर्व ढाबा चालकांना मोफत मास्क व हॅन्डग्लोज दिले. सोबतच रुग्णसेवा युवा ग्रुपच्या वतीने विशेष पत्रक तयार करून ते पत्रक शेलूबाजार परिसरासह तालुक्यातील इतर ठिकाणी वाटप करण्यात येते आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्यसेवा करीत असलेला रुग्णसेवा युवा ग्रुप हा नेहमीच जनतेच्या रक्षणाकरिता हजर असतो. ही मोहीम जनजागृती मोहीम यशस्वी करण्यासाठी  डॉ नितीन धोटे, संतोषभाऊ लांभाडे, सुरेंद्र पाटील राऊत, राम पाटील सुर्वे, विनायक सुर्वे, शुभम डोफेकर, राहुल रोकडे, सोहम वानखडे, मंगेश बारड, गौरव येवले, अश्विन इंगोले, शेंद्रे, सदाशिव राऊत, सचिन राऊत, विक्की सुर्वे, शिवा सावके आदी सदस्य प्रयत्न करत आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206,9763007835

No comments:

Post a Comment