तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 26 March 2020

अडचणीत असाल किंवा गैरसोय होत असेल तर संपर्क करा आम्ही उपलब्ध आहोत ; बाहेर अडकलेल्या बीडकरांना खा.प्रितमताई मुंडे यांचे आश्वासक आवाहनबीड (प्रतिनिधी) :- दि.२६----कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात सध्या लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.वेगवेगळ्या कामांनिमित्त जिल्ह्याबाहेर गेलेल्या व लॉकडाऊन मुळे बाहेर अडकून पडलेल्या बीडकरांनी आहेत तिथेच सुरक्षित थांबावे.त्याठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण असेल किंवा गैरसोय होत असेल तर नागरीकांनी संपर्क साधावा आम्ही उपलब्ध आहोत अशा शब्दात जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी बाहेर अडकलेल्या नागरीकांना आश्वस्त केले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.अशा परिस्थितीत बाहेर अडकलेल्या बीडकरांनी घाबरून जाऊ नये,आहेत त्या ठिकाणी सुरक्षित थांबावे.कोणतीही अडचण असेल किंवा गैरसोय होत असेल तर संपर्क साधावा आम्ही उपलब्ध आहोत असे आवाहन खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केले आहे.

तसेच प्रशासन व यंत्रणा अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वसामान्यांची काळजी घेत असून नागरीकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाला सहकार्य करावे.बाहेर अडकलेल्या नागरीकांची संयम बाळगावा स्थानिक प्रशासन आपली आवश्यक ती खबरदारी घेईल,स्वतःचा व हजारोंचा जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची जोखीम नागरीकांनी घेऊ नये अशी विनंती देखील खा.मुंडे यांनी केली आहे.

वृंदावनात अडकलेल्या त्या “नव्वद" भाविकांना प्रितमताईंनी केले आश्वस्त

तीर्थयात्रा व भागवत कथेसाठी गेलेले परळीचे नव्वद भाविक सध्या उत्तर प्रदेशच्या वृंदावन येथे अडकले आहेत.खा.प्रितमताई मुंडे यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी व मथुरा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून त्या भाविकांची खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.स्थानिक प्रशासनाला खा.मुंडे यांनी सूचना केल्यामुळे त्या भाविकांना व त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

No comments:

Post a Comment