तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 25 March 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हवालदिल नागरिकांना सामान्य उपचारासाठी परळीतील खाजगी दवाखाने सुरु ठेवा- अनंत इंगळेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
      कोरोना वायरस च्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये अगोदरच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर हवालदिल झालेल्या नागरिकांना सामान्य आजारावरील उपचारासाठी  खाजगी दवाखाने बंद असल्याने आणखीन संकटाचा सामना करावा लागत आहे. अगोदरच बेचैन झालेल्या नागरिकांवर सामान्य उपचारांसाठी ही कुचंबणा सहन करण्याची वेळ आली आहे. सर्वांनी सामूहिकरीत्या कोरोनाच्या या राष्ट्रीय आपत्तीचा सामना करणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत परळीतील खाजगी दवाखाने सुरू ठेवून शहरातील डॉक्टरांनी नागरिकांना उपचार द्यावेत असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस अनंत इंगळे यांनी केले आहे.
    कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार यावर उपाय योजना युध्द पातळीवर राबवत आहे.या राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी शहरातील खाजगी दवाखाने व डॉक्टरांनी आपली सेवा बंद ठेवणे योग्य नाही. नागरिकांना    तपासणीसाठी परळीत शासकीय दवाखाना सोडला तर  एकही दवाखाना उपलब्ध नाही. त्यामुळे शहरातील खाजगी  सर्व डॉक्टरांनी  दवाखान्यातील ओपीडी चालु करावी. संचारबंदी चा शिथिल वेळ 11 ते 3  च्या दरम्यान काही वेळ तरी निदान ओपीडी चालु करावी.लहान मुलांना दुखापती,वयोवृद्ध व्यक्तींना श्वसनाचे आजार, संडास उलटी, तापीचे आजार आदींसाठी उपचाराची सोय उपलब्ध होण्यासाठी सर्व खाजगी दवाखाने सुरू ठेवून सहकार्य करावे.डॉक्टरांनी दवाखाने बंद केली तर लोकं हतबल होतील शासकीय सेवेत असणारे डॉक्टर व इतर कर्मचारी सेवा देत आहेत खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरानी सेवा द्यायला काय हरकत आहे. त्यामुळे खाजगी दवाखाने सुरू ठेवून सहकार्य करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस अनंत इंगळे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment