तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 23 March 2020

जनता करफ्युमुळे देशहितासाठी कुंकवाच्या कार्यक्रमातच आटोपला विवाह सोहळा


(विश्वनाथ देशमुख सेनगांवकर)


सेनगांव/प्रतिनिधी:- तालुक्यातील सिनगी (नागा) येथील प्रगतशिल शेतकरी आनंतराव पुंजाजी गिते(पाटील) यांची मुलगी चि.सौ.का.प्रियंका व पांगरी(बाळसखा) ता.जि.हिंगोली  येथील रामप्रसाद कुंडलीकराव लिंबुळे-पाटील यांचा विवाह सोहळा दि.22 मार्च रविवार रोजी आयोजित केला होता.परंतु कोराना या महामारी रोगाच्या पाश्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि.22 मार्च रविवार रोजी जनता करफ्यु चे आवाहन केल्याने दोन्ही कुटुंबियांनी हा विवाह सोहळा पै-पाहुण्याविना दि.21 मार्च शनिवार रोजी कुंकवाच्या कार्यक्रमातच उरकुन घेतल्याने परीसरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.
अधिक माहीती अशी की,सिनगी(नागा)येथील प्रगतशील शेतकरी आनंतराव पुंजाजी गिते-पाटील यांची मुलगी चि.सौ.का.प्रियंका हिचा विवाह पांगरी(बाळसखा)ता.जि.हिंगोली येथील रामप्रसाद कुंडलीकराव लिंबुळे-पाटील यांचा मुलगा चि. बालाजी याच्या सोबत एक महिन्यापुर्वी दि.22 मार्चला ठरला होता.दरम्यान दोन्ही कुटुंबियांनी पत्रिका छापुन विवाह सोहळ्याची जय्यत तयारी देखील केली होती.दोन्ही परीवाराकडुन पै-पाहुण्यांना मुळपत्रिका देखील वाटप करण्यात आल्या होत्या.परंतु भारतासह संपुर्ण जगाला कोराना या महाभयंकर रोगाने वेढल्याने या पासुन बचावासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि.22 मार्च रविवार रोजी जनता करफ्यु मध्ये प्रत्येक नागरीकांने सामील व्हावे असे आवाहन केले.सामाजिक बांधिलकी व देशहितासाठी गिते-पाटील व लिंबुळे-पाटील कुटुंबियांनी 20 जणांच्या उपस्थितच दि.21 मार्च शनिवार रोजी कुंकवाच्या कार्यक्रमातच हा विवाह सोहळा उरकून घेतला.या विवाहासाठी वराचे वडील रामप्रसाद कुंडलीकराव लिंबुळे-पाटील व वधुचे वडील आनंतराव पुंजाजी गिते-पाटील यांच्यासह नितिन गोरे,प्रल्हादराव कोटकर,शिवाजी गिते,धनाजी गिते,नारायण गिते,त्र्यंबकराव गिते,अर्जुनराव गिते,भागवत गिते व लिंबळे-पाटील यांच्या कुटुंबियांनी पुढाकार घेतला.या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


विश्वनाथ देशमुख सेनगांवकर
तेजन्यूज हेडलाईन्स 
तालुका प्रतिनिधी सेनगाव 
व्हाट्स एप नं.9604948599

No comments:

Post a Comment