तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 25 March 2020

हातावर पोट असणाऱ्यांचे काय?रोजंदारी कामगारांची उपासमारजिल्हाधिकारी साहेब गरीबांच्या ऊदरनिर्वाहाची सोय लावा हो!

फुलचंद भगत यांची प्रशासनाला आर्त हाक

वाशिम(फुलचंद भगत)-कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रशासन आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. गर्दीत एकमेकांच्या संपर्कात येऊन संसर्गाचा धोका लक्षात घेता संचारबंदी लावण्यात आली मात्र हातावर पोट असलेल्या रोज कमावून खाणाऱ्यांचे काय, हा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे.वाशिम जिल्ह्यात कामगार,रोजंदारीवाले मजुर,रस्त्यावर भिक मागणारे गरीब गरजु यांना तर रोज बाहेर जावुन कमवुनच खावे लागते ना.मग अशा हातावरचे पोट असणारे या एकविस दिवसाच्या कर्फुमध्ये तग कसे धरतील बरं?वाशिम जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी साहेब अशा गरीबाची पोटापान्याची सोय लावा हो!अशी आर्त हाक आता ऐकावयास मिळत आहे.प्रशासन सर्व जनतेच्या हितासाठी कटिबध्द असल्यामुळे नक्कीच हाही प्रश्न निकाली काढतील पण सरकारी काम आणी बारा महिने थांब अशामुळे तर कोरोनापुर्वीच वाड्यावस्त्यामध्ये,झोपडपट्यामध्ये लोक भुकमारीने मरतील.जवळ ना दमडी,हाताला काम नाही मग अशात कुणी ऊधारही देत नाही,दुकानदारही आता ऊभे करत नाही मग मायबाप शासनानेच आता अशा गरीबांना मदतीचा हात देन्याची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी मांडले आहे.
       कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रशासन आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. गर्दीत एकमेकांच्या संपर्कात येऊन संसर्गाचा धोका लक्षात घेता संचारबंदी लावण्यात आली असून लोकांनी कामावर न जाता घरी बसणे हेच मोठे योगदान आज ठरत आहे. कंपन्या, कारखाने, ऑफीस, सर्वच बंद, रोजची कामेही बंद झाली आहेत. ही परिस्थितीची गरजेही आहे. मात्र हातावर पोट असलेल्या रोज कमावून खाणाऱ्यांचे काय, हा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका या असंघटित कामगारांनाच बसत आहे. काम बंद झाल्याने घरी बसून आहेत. तेव्हा जगणार कसे? खाणार काय? कुटुंबाचे काय? असे अनेक प्रश्न यांच्यापुढे आ वासून उभे आहेत.
देशातील असंघटित कामगारांचे प्रमाण तब्बल ९३ टक्के इतके आहे. यात घरकाम करणाऱ्या मोलकरणी, बांधकाम मजूर, कारखान्यात काम करणारे कामगार, वीटभट्टीवर काम करणारे मजूर, लहान दुकानात काम करणारे, हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये काम करणारे, बिल्डरकडे काम करणारे, छोट्या ऑफीसमध्ये काम करणारे आदींचा यात समावेश होतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सर्वांचेच काम एका झटक्यात सुटले. शासनाने कितीही सांगितले की अशा लोकांचे वेतन कापू नये, कामगार विभागाने जी.आर. सुद्धा जारी केला की कोणत्याही मजुराचे किंवा कामगारांचे वेतन कापल्या जाणार नाही. परंतु याचे पालन किती होणार? हा मुख्य मुद्दा आहे. घरच्या मोलकरणीला पगारी सुटी देणारे कितीजण असतील, हाही मुख्य प्रश्न आहे. ३१ तारखेपर्यंत ही मंडळी घरी राहणार. परिस्थिती आटोक्यात आली तर ठीक अन्यथा समोरची स्थिती यापेक्षा भीषण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यादरम्यान त्यांच्याकडे पैसे असण्याचा प्रश्नच येत नाही. काही सामाजिक संघटना पुढाकार घेऊन रस्त्यावरीच गरीब, निराधारांची मदत करीत आहेत. परंतु या असंघटित कामगारांकडे सध्या तरी दुर्लक्ष आहे. तेव्हा अशांसाठी शासनानेच पुढाकार घेण्याची गरज आहे.अनेक मजुर पुणे,मुंबईसारख्या मोठ्या शहरात कामासाठी गेलेले आहेत,आता हातालाच काम नसल्याने घरी बसुन खाणार तरी काय असा यक्षप्रश्नही त्यांच्यापुढे ऊभा झाल्याने आम्हाला घरी न्या हो अशी हाक ते आपल्या गावातल्या नातेवाईकांना देत आहेत पण सर्व जिल्ह्यांनी आपल्या सिमा बंद केल्याने ते गावी तरी येतील कसे असाही प्रश्न ऊद्भवलेला आहे अशाही लोकांची आहे तिथे तपासणी करुन आपापल्या गावी येन्यासाठी प्रयत्न जिल्हाप्रशासनाने करावेत आणी गावी आल्यानंतरही त्यांची पुन्हा तपासणी करावी पण लोकांना घरी आनन्यास मदत करावी असेही फुलचंद भगत यांनी सांगीतले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835,8459273206

No comments:

Post a Comment