तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 20 March 2020

परळीत सोशल मिडीयांवर कोरोना विषाणूची जाणीवपूर्वक अफवा- पसरविल्या प्रकरणी तीन जणांविरुद्धात परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळीत सोशल मिडीयांच्या माध्यमातून कोरोना विषाणू संदर्भात जाणीवपूर्वक अफवा- पसरवून व्देषभाव तेढ व भीती निर्माण करणाऱ्यावर परळी शहर पोलिस ठाण्यात तीन जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
     याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळाली माहिती अशी की, दि. 19-03-2020 रोजी  " परळीत कोरोना पाझटिव्ह पेशंट सापडला विद्यानगर मधील एक चा मुलगा दुबई मध्ये राहता तो व्हायरस घेवून आला " अशी पीस्ट व्हॉटसअप ग्रुपवर प्रसारित केली सदर पोस्ट बाबत कोणतीही खातरजमा न करता आरोपीने परळी शहरातील जनतेमध्ये भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने पोस्ट केली,म्हणून आरोपी गोविंद बड़े व इतर दोन आरोपी विरुद्धात पोलीस ठाणे परळी शहर गुरन, 942020 कलम 505(1)(ब),34 भादविप्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत कदम व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदिप एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार सुदाम गित्ते  हे करीत आहेत. 
        पोलीस अधीक्षक श्री.हर्ष ए.पोडार यांच्या आदेशाने बीड जिन्ह्यात "कोरोना" (कोकिड-19) विषाणू संदर्भाने कोणत्याही बाबीवरील अफवा पसरविणाऱ्यांवर "सोशल मिडीया सेल"च्या माध्यमातून करडी नजर ठेवण्यात आली आहे. पोलीस ठाण्यांमध्ये कोरोना (काकीड- 19) या बाबत अफवा पसरविण्याचे वृत्त सोशल मिडीया याद्वारे प्रसिध्ध करून द्वेषभाव व तेढ निर्माण करण्याच्या उदेशाने कृत्य केले व प्रयत्न केले म्हणून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच पुढील तपास सुरु आहे. तरी समस्त बीड जिल्ह्यातील नागरिकांना बीड पोलीसांकडून आवाहन करण्यात येत आहे की, कोणीही कोणत्याही प्रकारची अफवा सोशल मिडीया व इतर माध्यमातून पसरवू नयेत. पोलीस पथक 24 तास सोशल मिडीयावर करडी नजर ठेवून आहेत. अफवा पसरविल्यास कडक कारवाई करण्यात येईल.  तसेच परळी पोलीस ठाण्याच्या वतीने ध्वनीक्षेपाच्या माध्यमातून कोरोनाच्या या संसर्गजन्य विषाणू बाबत जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment