तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 26 March 2020

कोरोनापासुन बचावात्मक ऊपाययोजनेच्या अनुषंगाने संचारबंदीच्या कर्तव्यावर असलेले पोलिसच असुरक्षीत


जनतेचं रक्षण माञ स्वतःच दहशतीत

पोलिसांवरही लक्ष देवून सुरक्षा कीट ऊपलब्ध करुन देन्याची गरज

वाशिम-(फुलचंद भगत)- कोरोनासारख्या भयंकर आजारावर मात करन्यासाठी सगळेकडे संचारबंदी असतांना जनतेच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनाही आता असुरक्षितता वाटत आहे त्यामुळे प्रशासनाने पोलिसांनाही सुरक्षा किट ऊपलब्ध करुन देन्याची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रसह संपूर्ण जगात कोरोना सारख्या महाभयंकर साथीने थैमान घातले असताना ज्यांच्या विश्वासावर हे युद्ध लढले जात आहे ते म्हणजे पोलीस प्रशासन मात्र असुविधांच्या अभावावर काम करताना दिसून येत आहे. पोलिसांच्या सुरक्षेसाठी कोरोना किट, हॅन्डग्लोज, सॅनिटायझर, मास्क, हे नसल्यामुळे पोलीस खातच चौदातास,बारातास ऑनड्युटी करून ज्या वेळेस  घरी जातो. त्यावेळेस पोलिसांच्या फॅमिलीलाही कोरोना आजाराची लागन होन्याची शक्यता नाकारता येत नाही.शासन स्तरावरून हे किट उपलब्ध न झाल्यामुळे पोलीस खात्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.जर कोरोना बाधित रुग्ण पोलिसांच्या संपर्कात आला तर पोलिसांना व पोलिसांच्या परिवाराला कोरोना शक्यता नाकारता येत नाही.वाशिम जिल्ह्यामध्ये  अधिकारी व  कर्मचारी रात्रंदिवस काम पाहतात. परंतु प्रशासनाकडून अद्यापही कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना कीट देण्यात आलेले नसल्याचे समजते.तरी शासन स्तरावर पोलिसांच्या सुरक्षेसाठी कोरोना किट, हॅन्डग्लोज, सॅनिटायझर, मास्क, हे पोलीस खात्यास उपलब्ध करून देण्यात यावं. जेणेकरून कोरोना सारखे व्हायरस विषाणूपासून पोलिसांचे रक्षण होईल.ज्या पद्धतीने नागरिकांना कोरोना सारख्या भयानक विषाणू बाबत उपाय योजना करण्यासाठी प्रशासन सांगत आहे. त्याच पद्धतीने पोलीस बांधवांसाठी विविध सामाजिक संस्था, तसेच शासन स्तरावर उपलब्ध करून देण्यात यावे.एरवी राजकीय ,सामाजिक संस्था,सामाजिक संघटना पूढे असतात मात्र आत्ता चालू घडीला कोणीच पुढे नाही…? राजकीय तसेच सामाजिक संस्थेने अशा किट उपलब्ध करून देऊन पोलीस खात्यास सहकार्य करावे. जनतेच्या रक्षणासाठी पोलीस आहेत. सर्वांनी काळजी घेऊया, कोरोना सारख्या भयानक रोगावर पोलीस खात्याच्या व आरोग्य खात्याच्या मदतीने मात करूया…..
विषाणू खूप छोटा आहे ,मात्र त्याचा प्रभाव खूप मोठा आहे.
प्रत्येक जण आपली खबरदारी घेऊया, घेऊन स्वतःची काळजी ,कोरोना आजाराला हरवूया हे शक्य होईल सर्वांच्या सहकार्याने आणी घ्यावयाच्या खबरदारीने.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206,9763007835

No comments:

Post a Comment