तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 21 March 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे आवाहनसर्व सन्माननीय नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना माननीय धनंजय मुंडे साहेब यांच्याकडून असा निरोप आहे की,

 ■ करोनाच्या पार्श्वभूमीवर आपापल्या भागातील अत्यावश्यक सेवा वगळता शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे दुकाने बंद राहतील यासाठी व्यापाऱ्यांना आवाहन करावे ,

■  तसेच काम नसताना विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांनाही आपापल्या घरी जाण्या संदर्भात आवाहन करावे..... 

■ आपापल्या प्रभागात स्वच्छता राहील याकडे लक्ष द्यावे ,

■  आपल्या स्वतःची व आपल्या कुटुंबीयांची ही सर्वात प्रथम काळजी घ्यावी

■  बाहेर देशातून किंवा करोना बाधित शहरातून आलेल्या नागरिकां संबंधी माहिती असेल तर ती प्रशासनाला कळवावी

■ आपल्या भागातील जे गरीब मजूर कामगार असतील आणि या बंदमुळे त्यांचे हाल होत असतील तर त्यांना शक्य ती सर्व प्रकारची मदत करावी

■ प्रशासनाच्या वतीने सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रत्येक सूचनेची 100% अंमलबजावणी करून करोनाचा ध्येयाने मुकाबला करावा

No comments:

Post a Comment