तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 26 March 2020

परळीचे शाहीनबाग आंदोलन. स्थगित


परळी वैजनाथ  (प्रतिनिधी) :- 
         संविधान संरक्षण समितीच्या वतीने येथील नेहरू चौक तळ परिसरात असलेल्या शाहीनबाग येथील आंदोलन २५ मार्च  पासून ते ३१ मार्च पर्यंत एन.आर.सी.व सी.ए.ए.  याविरुद्धचे धरणे आंदोलन देशावर कोरोना वायरसच्या माध्यमातून आलेली राष्ट्रीय आपत्तीमुळे स्थगित करण्यात आले आहे.  
               जगासह संपूर्ण देशात सध्या करोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी देशात अनेक उपाययोजना चालू आहेत.संपूर्ण देश लाँक डाऊन केला आहे. या परिस्थितीत नागरिकांचे आरोग्य हा महत्वाचा घटक आहे तेंव्हा या स्थितीत संविधान सरंक्षण समितीच्या वतीने सुरु असलेले हे दरणे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. देशात सर्व परिस्थिती सामान्य झाल्यानंतर पुन्हा हे धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल. प्रशासनाला कोणतीही अडचण निर्माण होवू नये म्हणून हे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे संविधान संरक्षण समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे. आमचा या कायद्याला विरोध कायम असून भारतीय नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आंदोलन स्थगित करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment