तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 26 March 2020

दिव्यांग आरोग्य कर्मचारी यांच्यावर झालेल्या लाठीहल्लाचा निषेध ; घटनेतील दोषींची चोकशी करून निलंबित करा-भक्तराम फडपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- हिंगोली येथे ड्यूटीवर असलेल्या नर्स आणि तिच्या जमादार वडिलांना हिंगोलीतील नांदेड नाका परिसरात महिला उपनिरिक्षक व तिच्या सहकारी पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. या लाठीमारात जबर जखमी झालेल्या नर्सच्या डोक्यास पाच टाके पडले आहेत. या घटनेची चोकशी करून दोषींवर कारवाई करून निलंबित करावे अशी मागणी परिचारिक भक्तराम फड यांनी केले आहे.

     देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकडाऊन सुरु आहे. दिव्यांग कर्मचारी स्टाफ नर्स यांना कर्तृत्वावर दक्ष असणाऱ्या ड्युटीवर जात असतांना पोलिस कर्मचाऱ्याकडून जबरदस्त मारहाण करण्यात आली आहे. याचा जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत. कोरोनाच्या विषाणूमुळे संपूर्ण जग हादरून गेले असतांना सर्व डॉक्टर, परिचारिक, आरोग्य कर्मचारी हे आपल्या परिवाराला सोडून आपला जीव धोक्यात टाकून आपलं कर्तव्य बजावत आहेत. आणि त्यांना जर असा मार खावा लागत असेल तरी शर्मेची बाब आहे. पोलिसांनी काही ठिकाणी फार अती केलंय.एखाद्या आरोपी सारखे बदडलेले आहे.दवाखान्यात काम करणाऱ्या लेडिज कर्मचारी ला सुध्दा पोलिसांनी मारून मारून डोकं फोडले आहे.पोलिसांचा कहर म्हणजे रजेवर असलेल्या भारतीय जवानाला घराजवळ असतानाही पोलिसांनी मारलेले आहे. तसेच वार्तांकनासाठी पत्रकारही आपला जीव धोक्यात टाकून झालेली घटना वार्तांकनाच्या माध्यमातून जनते समोर देत आहेत. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभालाही या खाकीवाल्यांनी सोडले नाही. हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात कार्यरत दिव्यांग कर्मचारी स्टाफ नर्स श्रीमती प्रियंका राठोड ह्या त्यांचे पोलीस दलात जमादार पदावर कार्यरत वडील साहेबराव राठोड यांच्यासह जात असताना महिला उपनिरिक्षक यांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप केला. त्यामुळे पोलिसांना आवरा...जनता आरोपी नाही, एवढे मारायची गरज नव्हती आणि नाही.त्यामुळे अशा पोलिसांवर कायदेशीर कारवाई करायला हवी. राज्याच्या गृहमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित पोलिसांवर चौकशीचे आदेश द्यावेत तसेच या घटनेचा आरोग्य कर्मचारी संघटनेने निषेध करून या घटनेच्या चौकशीची करावी अशी मागणी परिचारक भक्तराम फड यांनी केली.

No comments:

Post a Comment