तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 26 March 2020

*साखरा परिसरात वादळी वार्यासह अवकाळी पावसाने झोडपले,विजपुरवठा अनेकदा खंडित* .


साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे  साखरा सह परिसरात काल दि.२५ ला राञी १०.०० च्या दरम्यान साखरा परिसरात वादळी वारा व   विजेच्या चमकण्यासह अवकाळी पाऊस सुरु झाला त्यातच विद्युत पुरवठा खंडित झाला. 
          काल राञी १०.०० च्या दरम्यान साखरा सह परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली .विजेच्या चमचम व हवेच्या गोंगाट,पावसाच्या रिपरिप सरीने वातावरणातील लयच बिघडली..पहीलेच कोरोना आपत्ती सुरु असताना ही नैसर्गिक आपत्ती आल्याने अनेकांची भांबेरी उडाली .त्यातच 
विद्युत पुरवठा खंडित झाल्याने एन उन्हाळ्यात नागरिकांच्या झोपा उडाल्या, अगोदरच कोरोना विषाणू ने थैमान घातल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असताना आता अस्मानी संकटाने विजेच्या कडकडासह अवकाळी पावसाला सुरुवात केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. साखरा परिसरातील  आदी ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचे काढणीला आलेला गहू, हरभरा तसेच काढून शेतात ठेवलेला गहू हरभरा, झाकण्यासाठी शेतकऱ्याची तारांबळ उडाली.


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a Comment