तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 26 March 2020

परळीत दुसऱ्या दिवशी लाकडाऊन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- कोरोनोच्या पार्श्वभूमीवर राज्यासह बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच भारत देशात 21 दिवस लाँकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या आवाहनाला 8 प्रतिसाद देत लाँक डाऊन पुकारले आहे. नागरिक वर्क फ्राँम होम   करीत आहेत. दरम्यान प्रशासनाच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
       तालुक्यातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ग्रामीण भागात सर्व दुकाने बंद  तर  शहरातील बाजारपेठेत अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने पूर्णपणे आहेत आजही बंद दरम्यान, भाजी व फळ मार्केटमध्ये काही किरकोळ व्यापारी करत आहेत विक्री भाजी खरेदीसाठी नागरिकांची 11 ते 3 या वेळेत ये जा सुरू नगरपालिका प्रशासनाकडून खरेदीसाठी गर्दी होता कामा नये, याची घेतली जातेय दक्षता मच्छिमार्केटमध्ये आजही शुकशुकाट  मच्छिविक्री सुरू झाल्यास याठिकाणी गर्दी होता कामा नये म्हणून न. प. निर्देश दिले होते. एकूणच शहरातील बाजारपेठेवर नगरपालिका प्रशासन व पोलिसांची करडी नजर नागरिकांना सहकार्य करण्याचे केले जातेय पोलिसांकडून आवाहन करण्यात आले होते. तसेच शहरात शासनाकडून संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर सुद्धा शहरात बिनदिक्कत फिरणाऱ्या युवकांच्या विरोधात परळी शहर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. वारंवार सूचना देऊन सुद्धा काही लोकांकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे पोलिसांनी अखेर "चोप" देण्यास सुरुवात केली आहे. परळी शहरामध्ये कायदाचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिसकांकडून चोप महाप्रसाद वाटप आला आहे. ही वेळ येऊ देऊ नका कायद्याचे उल्लंघन न करता आपल्या घरी बसा पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment