तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 21 March 2020

जिल्हाधिकारी यांचे आदेश न पाळणार्‍या दुकानदारांवर कारवाईपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आस्थापना, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचे पालन न करणार्‍या शहरातील 20 व्यापार्‍यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.
       याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोरोना या विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज आणि उद्या जिल्ह्यातील दुकाने, आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. याला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला. परळीतही चोहीकडे बंद पाळला. मात्र काही दुकानदारांनी जिल्हाधिकारी यांचे आदेश पाळले नाही. यामुळे शहर पोलीस ठाण्याचे स. पो. नि. एकशिंगे, पोलीस शिपाई भाजीभाकरे, पोलीस नाईक इंगळे यांनी आदेशाची अंमलबजावणी न करणार्‍या दुकानदारांविरोधात कारवाई केली आहे.

No comments:

Post a Comment