तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 23 March 2020

गेवराई तालुक्यात 'जनता कर्फ्यू' बसस्थानक, रस्ते, चौक निर्मनूष्य..


सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि.  २२ _ जनतेने ठरवले तर काहीच अशक्य नाही. याचा अनुभव रविवार, दि. २२ रोजी पहायला मिळाला. सकाळी सात वाजल्यापासून तालुक्यातील विविध भागात राहणाऱ्या जनतेने अभूतपूर्व प्रतिसाद दिला. रस्त्यावर न येता नागरिकांनी घरात थांबणे पसंत केल्याने सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट होता.
        गेवराई शहरात रविवार, दि. २२ रोजी सकाळी सात वाजता गेवराई नगर परिषदेचा "सायरन"  वाजला आणि रस्त्यावर..घराबाहेर..चौकात थांबलेले लोक आप आपल्या घरात जाऊन बसले. दुधावाले सकाळीच येऊन गेले. नगर परिषदेने साडेपाच वाजता नळाला पाणी सोडले, साडेसहाला बंद झाले. सातच्या आत स्वच्छता पूर्ण करून नपचे कामगार घरी गेले. छत्रपती शिवाजी चौक, मोंढा मार्केट, कोल्हेर रोड, बसस्थानक, मेन रोड, बायपास, राष्ट्रीय महामार्ग, जुने बसस्थानक, शास्त्री चौक, ताकडगाव रोड, कोर्ट रोडवर शुकशुकाट होता. पोलीस, आरोग्य, महसूल , पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेवून होते. जनतेने ठरवले तर काहीही शक्य आहे. याचा अनुभव रविवारी पहायला मिळाला.
      सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत तालुक्यातील विविध भागात राहणाऱ्या जनतेने अभूतपूर्व प्रतिसाद दिला. रस्त्यावर न येता लोकांनी घरात बसने पसंत केल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. गाड्यांची वर्दळ नव्हती. गाड्यांचा कर्णकर्कश आवाज येत नव्हता. दुकानांना टाळे लागले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देशवासियांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सायंकाळी नागरीकांनी थाळीनाद करून कोरोना "गो"  चा नारा दिला आहे.
---------------------
वैद्यकीय सेवेतील
कर्मचाऱ्याबद्दल कृतज्ञता
------------------------------
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास थाळ्या वाजवण्याचा खणखणाट झाला, प्रत्येक ठिकाणी गच्चीवर येऊन नागरिकांनी ताट, डिश,पराती वाजवत थाळीनाद केला. प्रत्येकानेच डॉक्टर्स आणि वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचं आवाहनही लोकांनी गांभीर्याने घेतले, जनता कर्फ्यु लोकांनी मनःपूर्वक पाळला. काहीजण बाहेर पडलेही असतील पण निर्मनुष्य रस्ते, गल्ल्या पाहून ते नक्कीच ओशाळले असतील. हा थाळीनाद आवश्यक होता की नव्हता ? ही चर्चा होत राहील पण त्याला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद हे सांगत होता की लोक शासनाच्या, प्रशासनाच्या सूचना मनोमन ऐकण्याच्या मनःस्थितीत आहेत. यातून कमालीचे ऐक्य निर्माण झाले. आज उंच गच्चीवर जाऊन रस्त्यांची,वस्त्यांची निर्मानुष्यता अनुभवली.करोनाचे गांभीर्य अधिक गडदपणे समजून घेतलं, कितीही विनोदी अंगाने त्याकडे पाहिलं तरी आतून भीती आहे ती आहेच पण संकटं माणसाला शहाणपण शिकवतात, थाळीनाद ही टेस्ट होती ती यशस्वी झाली. आपण एक आहोत आणि संकट परतवून लाऊत हा विश्वास आता निर्माण झालाय, तो आगामी काळात टिकवून ठेवणं आवश्यक आहे.

╭════════════╮
   ▌प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment