तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 20 March 2020

श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक म. रा.अंभोरे यांचे निधनपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे शिस्तप्रिय,मनमिळावू, व कर्तव्यदक्ष संस्थापक-अध्यक्ष म. रा.अंभोरे (माजी मुख्य अभियंता औष्णिक विद्युत केंद्र परळी) यांचे दि.१८/०३/२०२०, बुधवार रोजी नागपूर येथे कर्करोगाने निधन झाले. त्यांना श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ, विद्यावर्धिनी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, विवेकवर्धिनी विद्यालय व स्वामी विवेकानंद वाचनालयाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमास संस्थेचे सचिव श्री. पी. जी. इटके, संचालक श्री. एस बी भिंगोरे,  श्री. एम. टी. मुंडे, श्री. पी. जे. पैंजणे, श्री. एस. एस. कोळगे, श्री. बी.ए.चेवले, मुख्याध्यापक श्री मातेकर, श्री.नांदुरकर तसेच तीनही शाळाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment