तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 20 March 2020

पातुर्डा ग्रा प कार्यालयात कोरोना संदर्भात मार्गदर्शन जनजागृती बैठक संपन्न


संग्रामपुर [ प्रतिनिधी] संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना संसर्गाला आता राज्यातही सुरुवात झाली  याला नागरिकांनी न घाबरता  दक्ष  राहुन आरोग्य विभागा करवी सुचने प्रमाणे उपाय योजना अमलबजावनी करून आरोग्य विभागाला सहकार्य  केल्यास कोरोनावर मात करणे शक्य असल्याचे मत तालुका वैधकिय अधिकारी वाडे यांनी पातुर्डा ग्रा प च्या वतीने कोरोना जनजागृती बैठक प्रसंगी मार्गदर्शन करतांना व्यकत केले ते पुढे म्हणाले कि मुंबई , पुणे सारख्या शहरात आता या कोरोना विषाणुच्या संशयीत रूग्ण पाहत  परिसरातही अनेकांना सर्दी ताप खोकला असे आजार दिसून येत आहेत.  मुंबई पुणे सारख्या शहरातुन पातुर्डा गावात येणाऱ्या रुग्णावर लक्ष् ठेऊन त्याची माहिती संबंधित आरोग्य विभाग व ग्रा प  प्रशासनाला देण्याचे देऊन नागरिकांनी सहकार्य करण्याचे आव्हाण केले कोरोना संबांधितांनी घ्यावायाची काळजी , शासकीय यंत्रनेला करावयाची मदत  विषषान्वये सदर कार्यशाळेत ग्रामविकास अधिकारी एस पी मेंहेगे यानी पातुडर्यातील खाजगी डॉक्टरांना सूचना दिल्यात. सदयास्थीतीत राज्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत तसेच पुणे मुंबई ,औरंगाबाद व राज्यातुन येणारे नातलग यांची माहिती ग्रा प देण्याचे सरपंच शैलजाताई भोंगळ यांच्या  आव्हाणाला प्रतिसाद म्हणुन पुणे येथुन आलेल्या नागरिकांनी ग्रा प ला नावाची नोंद केली व वैधकिय तपासणी करून घेतली  यावेळी तालुका वैधकिय अधिकारी वाडे यांनी  कोरोना विषाणु प्रादुर्भाव रोखण्यासाठी जास्त गर्दीच्या ठिकाणा नागरिकांनी जाणे टाळावे अत्याश्यक गरजे नुसारच बाहेर पडावे व जास्तीत जास्त वेळो वेळी हात धुवुन स्वच्छता पाळावी असे आव्हाण तालुका आरोग्य अधिकारी वाडे यांनी केले यावेळी लोकनियुक्त सरपंच श्रीमती शैलेजाताई भोंगळ, उपसरपंच निलेश चांडक , ग्रा प सदस्य दिनकर इंगळे ग्रा प सदस्या पुनम मांडवगडे, तंटामुक्त स अध्यक्ष देविदास इंगळे, सिद्धार्थ गाडे, मोहन बोपले, मनोज वानखडे, पो पा गणेश सुरडकार, पत्रकार श्याम इंगळे, सुनिल इंगळे, ग्रा प कर्मचारी संजय सातव, विलास इंगळे, सै लयाकत, विठ्ठल इंगळे, अशोक देशमुख, व आरोग्य कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते. पातुर्डाग्राम पंचायत कडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती संपुर्ण जगात कोरोना व्हायरसने नाकीनऊ आणले तर कोरोना विषाणु संसर्गची लागत होऊनये म्हणुन वेळीच उपाय योजना केलेल्या बऱ्या म्हणुन  पातुर्डा बु  ग्रा प च्या वतीने गावात अॅटो वरुन लाऊडिस्पीकर ,मुनयादी मार्फत जनजागृती सुरु आहे तसेच ठिक ठिकाणी कोरोना बाबत जनजागृती बॅनर लावलेत कोरोना विषाणु संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन  स्वच्छा पाळण्याचे तसेच सर्दी खोकला डोकेदुखी , स्वास घेण्यास त्रास होत असल्यास असे लक्षणे दिसुन आल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आव्हान  ग्रा प सरपंच शैलजाताई भोंगळ व  ग्रा प प्रशासनाडून करण्यात आले आहे

No comments:

Post a Comment