तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 23 March 2020

मंगरुळपीर तालुक्यातील 'जनता कर्फ्यु' यशस्वी वाटचालीकडे....

फुलचंद भगत
मंगरुळपीर:  कोरोना वायरस या जागतिक महामारी पासून देशातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने " जनता कर्फ्यु ला मंगरुळपीर शहरात तसेच ग्रामिण भागातही खूप चांगला प्रतिसाद नागरिकांकडून मिळत आहे. जनता कर्फ्यु असल्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या घरात थांबत बंद पाळण्यात आला आहे,त्या सोबतच दुकाने, पान टपऱ्या ,व्यापार ,संपूर्ण बंद आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यु चे आवाहन केले होते.आज संपूर्ण देशामध्ये सकाळी ७.०० ते रात्री ९.०० वाजता पर्यंत घराबाहेर पडू नये,कोणाच्याही संपर्कात येऊ नये,कोरोना वायरस  पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपल्या घरा मध्येच सुरक्षित राहावे असे आवाहन करण्यात आले होते.या सुचनांचे नागरिक पालन करीत असल्याचे सर्वत्र चित्र आहे. तसेच मंगरुळपीर नगरपरिषद आरोग्य विभागाकडून पोलिस विभागाकडुन जनतेला घरातच राहन्याचे आवाहन करन्यात येत आहे तरी सर्व नागरिकांनी घराबाहेर येऊ नये आणि स्वतःची काळजी घ्यावी,मंगरुळपीर पोलिस स्टेशन मार्फत आणि पोलिस कर्मचारी सुरक्षेच्या दृष्टीने शहरात राऊंड मारत आहे.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206,9763007835

No comments:

Post a Comment