तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 23 March 2020

परळीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर पिन ड्रोप सायलेन्स


कोरोना लढा : जनता कर्फ्यू च्या पार्श्वभूमीवर परळीसह तालुक्यात कडकडीत बंद

परळी,(प्रतिनिधी):- कोरोना चा जंतू संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण भारतात जनता कर्फ्यू चे आवाहन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले होते. मोदींच्या या आव्हानाला बीड जिल्ह्यासह परळी शहर व तालुक्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याचे चित्र रविवारी दिसून आले. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या परळीत नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. रविवारी मात्र परळी शहर व तालुक्यात विशेषता ग्रामीण भागात जनता कर्फ्यू च्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आला. कोरोना हद्दपार करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने कंबर कसली आहे. प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी या अगोदरच परळी येथील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शनिवारपासूनच परळी मध्ये आत्याअवश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आली होती.

कोरोना व्हायरसचे  संक्रमन होऊ नये या करिता बीड चे जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांच्या निर्देशानुसार परळी शहर व तालुक्यातील सिरसाळा, नागापूर, दादाहरी वडगाव, धर्मापुरी आदी सर्कल मध्ये दि.22 मार्च 2020   रविवार रोजी सकाळ पासून  कडकडीत बंद पाळण्यात आला. रस्ते निर्मनुष्य झाले होते. परळी शहरातील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आझाद चौक, बसस्थानक परिसर, रेल्वेस्थानक परिसर, सबरस हॉटेलसह शहरातील मुख्य रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला. परळीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर पिन ड्रोप सायलेन्स ची परिस्थिती बघायला मिळत होती.

परळी तालुक्यातील सिरसाळा हे मोठं बाजारपेठ असल्याने येथील बंदमुळे गावात शुकशुकाट पसरला होता.  खाजगी पतसंस्था,  किराणा दुकान, हाॅटेल,  पान टपर्या वाल्यांनीही या कोरोना विषानूच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवले  आणी प्रशासनास सहकार्य केले.

परळीत-जनता कर्फ्युला आतापर्यंत येथील नागरीकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. गल्लीबोळासह मुख्य रस्ते निर्मनुष्य झाले असून मुख्य चौकांमध्ये पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

आज सकाळपासून शांतता दिसून येत आहे. वाहनाचे आवाज, हॉर्नचा कलकलाट दररोज सकाळ होताच सुरू होते. पण आज अपवाद ठरला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले. त्याला परळीत व ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद दिला आहे.

दूध नाही, वृत्तपत्रं नाही, रेल्वे स्थानकातही शुकशुकाट

परळी मध्ये कडकडीत बंद

वैद्यनाथ मंदिर, जगमित्र मंदिर, परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

परळीतील रस्त्यांवर फक्त पोलीसच; घराबाहेर न पडण्याचे पोलिसांकडून आवाहन

 रेल्वे स्टेशन, बस्थानाक , उड्डाणपूलावर कायम वर्दळ दिसणाऱ्या रस्त्यांवरही शुकशुकाट पसरला आहे.

 ग्रामीण भागात पूर्ण शुकशुकाट पसरला असून, रस्त्यांवर माणसांची वर्दळ दिसेनाशी झाली आहे.

मोदींच्या जनता कर्फ्युला परळीकरांचा पाठिंबा, सर्व रस्ते झाले निर्मनुष्य

No comments:

Post a Comment