तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 25 March 2020

पांगरी कॅम्प येथे आरोग्य उपकेंद्रात कोरोणाच्या पार्श्वभूमीवर परजिल्ह्यातून परतलेल्यांची आरोग्य तपासणी
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- कामासाठी व रोजीरोटीसाठी पुणे-मुंबई व परजिल्ह्यात गेलेले अनेक जण कोरोणाच्या पार्श्वभूमीवर शासनाने केलेल्या बंद व संचार बंदी मुळे पांगरी,पांगरी कॅम्प,पांगरी तांडा, लिंबुटा, लिंबूटा तांडा,देशमुख टाकळी,आदी परिसरातील बरेच जण वापस आले असून आज मंगळवार दि.२४ रोजी अशा अनेकांची व परजिल्ह्यातून आलेल्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली,आणि योग्य त्या सूचनाही त्यांना देण्यात आल्या.यावेळी पी.एस.सी.शिरसाळा येथील डॉ. सोमनाथ मुंडे,गित्ते साहेब(ग्रामसेवक पांगरी),डॉ.राधाकिशन राऊत(सुपरवायझर शिरसाळा), शिवाजी राठोड(लॅब टेक्निशियन), के.बी कळणे(आरोग्य सेविका), एम.एम.लटपटे,(ए.एन.एम.),आशा मुंडे(आशा कार्यकर्ती पांगरी), अर्चना मुंडे(आशा कार्य.लिंबुटा),सुनिता होळंबे,संगीता राठोड,उषा राठोड,केशव पाटील, चैत्रा वैद्य यांच्यासह सह अनेक जण उपस्थित होते. 

No comments:

Post a comment