तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 26 March 2020

कठीण प्रसंग उद्भवल्यास किंवा गंभीर अडचण आल्यास पालक मंत्री कार्यालयाशी संपर्क साधावा, तातडीने सहकार्य होईल ; करोना लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव

 देशमुख यांचे आव्हान
लातूर (प्रतिनधी) :- करोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी संपूर्ण देश आणि राज्य लाॅक डाउन करण्यात आले आहेत करोना पासून जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे लातूर जिल्ह्यातील जनतेकडूनही या कामी मोलाचे सहकार्य मिळत आहे आगामी काही दिवस अशाच प्रकारे धैर्य आणि संयम दाखवून समाजातील सर्वच घटकांनी करोना मुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा मुकाबला करायचा आहे असे सांगून अपवादाने एखादी कठीण परिस्थिती  उद्भवल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधून मदत मिळवावी असे आव्हान लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे
पालकमंत्री अमित देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या  निवेदनात म्हटले आहे की लॉक डाऊन च्या काळात जनतेला जीवनावश्यक वस्तू औषधे व इतर काही गोष्टी मिळाव्यात म्हणून प्रशासन दक्ष राहून काळजी घेत आहे वाहतूक व्यवस्था बंद झाल्यामुळे काही लोकांची मात्र गैरसोय झाली आहे असले तरी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वांनी आहे त्याच ठिकाणी थांबून प्रशासनाला सहकार्य करायचे आहे एकाही नागरिकाला कोणतीही अडचण येणार नाही कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची सर्वतोपरी काळजी शासनाने घेतली आहे असले तरी अपवादाने एखादी गंभीर परिस्थिती उद्भवली तर माझे कार्यालय मदती साठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे कठीण परिस्थितीत नागरिकांनी माझे खाजगी सचिव किसन जावळे ९०११०१६९९९ विशेष कार्य अधिकारी रविकिरण जोशी ९८६९२०३४१८, संजय जाधव ९९६०१२७१११, श्रीकांत सोनवणे ९३२५२२२२२२, मधुकर गुंजकार ९९२१०८९९११, सहाय्यक
विनायक निकम ९८६७७९८१४२,
मनोज कांबळे ८४२५९०३१३१, काकासाहेब लहाडे,९८६७४९५३४३, तसेच लातूर  शहर कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी पांडुरंग कोळगे ९४०४४२७५०३, सहाय्यक सुजित देशपांडे 9423617243, राजकुमार भोसले,९४२००० ४००२, संतोष गडदे ७५८८६११४८१, राहुल इंगळे ९८९०५७७१२८, संजय माने ८००७७७१५५५,
अमोल देशमुख ९९६०४७२१८५, गोविंद जोशी ९४२२३३००००,  रियाज सय्यद ९६०४४८३३३३, सचिन खोसे ९७६८००१६२८ आणि दीपक पाटील ९०९६६७७७८० यांच्याशी संपर्क साधावा आपली अडचण दूर करण्यासाठी संबंधित यंत्रणेशी बोलून निश्चित असे प्रयत्न केले जातील असे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment