तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 20 March 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धर्मराज पुरी व शिरीष नाकाडे यांच्या पुढाकाराने लाडझरीत फवारणीपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील लाडझरी गावात धर्मराज रामदत्त पुरी व शिरीष दत्तात्रय नाकाडे या युवकाने पाठीवर फवारा घेवुन सर्व गावात फवारणी केली.पुणे मुंबईहुन लोक परत आल्यामुळे कोरोना व्हायरसचा गावात शिरकाव होऊ शकतो खबरदारी म्हणुन गावात फवारणी करण्यात आली. बाहेरून आलेल्या नागरीकानी ग्रामपंचायत कार्यलयात नोदंणी करण्याचे आव्हान तलाठी गुणाले मॅडम, ग्रामसेवक मुकाडे, सरपंच सुर्यकांत मुंडे , बळीराम तिडके यांनी केले आहे. 
   गावातील लोकांनी खबरदारी म्हणुन मास्क किंवा हातरुमाल वापरावे सतत हात धुवावेत गर्दि टाळावी बाहेर न फिरता घरी बसुण राहावे अशी माहीति लाडझरी सज्जाचे तलाठी रेश्मा गुणाले मॅडम यांनी गावात येवुन दीली आहे . लाडझरी गावात पुण्यावरुन आलेल्या नागरीकांनी खबरदारी म्हणुन ग्रामपंचायत कार्यालयात नोंदणी करावी याची विनती मी त्या लोकांना फोन करुन केली आहे. खबरदारी म्हणुन पाडव्यापासुन सुरु होणारा सप्ता न करण्याची विनती गावातल्या नागरिकानां केली आहे गावातल्या प्रत्येक हालचालीवर माझे लक्ष आहे .रेश्मा गुणाले तलाठी लाडझरी यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment