तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 23 March 2020

कोरोनामुळे 'जगमित्र' कार्यालय ३१ मार्चपर्यंत बंद!


नागरिकांनी आपल्या अडचणी - तक्रारी व्हाट्सअप्प, ई-मेलद्वारे पाठवण्याचे धनंजय मुंडेंचे आवाहन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) (दि.२२) ---- : कोरोना विषाणूचा संभाव्य धोका टाळण्याच्या पार्श्वभूमीवर सुचवलेल्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे परळी येथील 'जगमित्र' हे संपर्क कार्यालय स्थापनेपासून पहिल्यांदाच बंद ठेवण्यात येणार आहे.

परळीसह जिल्हाभरातील कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेशी धनंजय मुंडे यांचा मोठ्या प्रमाणात थेट संपर्क असल्यामुळे त्यांच्या संपर्क कार्यालयात कायम गर्दी असते. अनेक लोक आपल्या मागण्या, समस्या, निवेदने देण्यासाठी, ना. मुंडे यांना भेटण्यासाठी येत असतात.

२४ तास लोकांसाठी सुरू असलेले ना. मुंडे यांचे कार्यालय बंद करण्याची ही पहिलीच वेळ असून त्यांच्या 'पंढरी' या निवासस्थानाला तर दरवाजाच नाही! परंतु खबरदारीचा उपाय म्हणून आता कार्यालय व घर भेटायला येणाऱ्या अभ्यंगतांसाठी  पुढील काही दिवस बंद करण्यात येणार आहेत.

कोरोना विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाला सुचवलेल्या उपाययोजनांमध्ये आज जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या आदेशात जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी आपले संपर्क कार्यालय व घर अभ्यंगतांसाठी बंद ठेवावे असे निर्देशित केले आहे. त्याची सुरुवात स्वतःपासून करत धनंजय मुंडे यांनी आपले संपर्क कार्यालय येत्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान नागरिकांना अत्यंत महत्वाचे काही काम किंवा अडचण असल्यास त्यांनी फोन, व्हाट्सअप्प किंवा ई-मेलद्वारे आपल्या अडचणी/मागण्या/समस्या पाठवाव्यात त्या सोडवण्याचा प्रयत्न करू, असे सांगून आपल्या कार्यालयाशी संपर्क करण्यासाठी खालील फोन नंबर्स व ई-मेल आयडी धनंजय मुंडे यांच्या वतीने देण्यात आले आहेत. तसेच प्रशासनासोबत संपर्क ठेवतच आपण सर्व जनतेच्याही विविध माध्यमातून संपर्कात राहू असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

मोबाईल नंबर्स....
1.प्रशांत जोशी (विशेष कार्य अधिकारी) : 9822532808
2.खंडू गोरे (स्वीय सहायक) :  9421342777
3.केशव नागरगोजे (स्वीय सहायक) : 9272672133
4.नागेश सुगरे (क्लार्क) :  9370245425
5.गणेश उगले (क्लार्क) :  9130303337

मेलआयडी...
 officeofdm@gmail.com

No comments:

Post a Comment