तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 13 March 2020

राहुल उंदरे २०२०च्या राज्यस्तरीय आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्काराने सन्मानितअकोला-यंदाचा मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्कार राहुल उंदरे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करन्यात आले असुन सदर पुरस्कार महाराष्टराज्य सरकारतर्फे देन्यात आला आहे.हा राज्यस्तरीय पुरस्कार महामहिम राज्यपाल श्री.भगतसिंग कोषयारी,मुख्यमंञी ऊध्दव ठाकरे तसेच ग्रामविकास मंञी हसन मुश्रीफ यांचे हस्ते दि.१२ मार्च रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे प्रदान करन्यात आला.
                वाशिम जिल्ह्यातील मुळ रहिवाशी असलेले आणी अकोला जिल्ह्यामध्ये आदर्श आणी कर्तव्यतत्पर ग्रामविकास अधिकारी म्हणून ओळख असलेल्या राहुल ऊंदरे यांनी आपल्या कार्यकाळामध्ये तिन ग्रामपंचायतींना निर्मलग्राम पुरस्कार मिळवुन दिला आहे.२०१०/११ मध्ये फुले शाहु आंबेडकर दलितवस्ती सुधार योजनेमध्ये जिल्ह्यातुन प्रथम क्रमांक मिळाला.ग्रामपंचायत शेकापुर येथे२०१८/१९ मध्ये स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळवुन दिला याव्यतिरिक्त कर वसुली,वृक्षलागवड,घरकुल योजना व इतर विकास योजनांमध्येही दिलेला लक्षांक विहित मुदतीत पुर्ण केला आहे.अशा जनसेवक म्हणून लौकीक असलेल्या राहुल ऊंदरे यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. राज्यातील ग्रामसेवक संघटनेने केलेल्या मागणीनुसार जिल्हापरिषद स्तरावर ऊत्कृष्ठरित्या काम करणार्‍या ग्रामसेवक/ग्रामविस्तार अधिकारी यांना शासनस्तरावरुन यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार देन्यात यावा अशी मागणी होती.सदरच्या मागणीनुसार शासनाने यासंदर्भात परिपञकही काढले आहे.२०२० मध्ये ऊत्कृष्ठरित्या काम करणार्‍या ग्रामविकास अधिकारी राहुल ऊंदरे यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याने सर्वस्तरातुन त्यांचे कौतुक होत आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835,8459273206

No comments:

Post a comment