तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 19 March 2020

अखेर वाशिम जिल्ह्यातील दारू दुकाने/बारही बंदचे आदेश


फुलचंद भगत यांच्या मागणीला यश

वाशिम-कोरोनोच्या प्रादृभावाचे संकट बघता वाशिम जिल्ह्यातील सर्व दारुचे दुकान,बार पुढील आदेशापर्यत बंद ठेवावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी प्रसिध्दीपञकाव्दारे प्रशासनाकडे केली होती.प्रशासनाने सौजन्य दाखवत आणी कोरोना आजारावर नियंञण मिळविन्यासाठी दि.१९ मार्च रोजी आदेश पारित करुन जील्ह्यातील सर्व दारुचे दुकाने आणी बार बंद करन्याचा निर्णय घेतला आहे.
              महाराष्ट्र राज्यात नोव्हेल कोरोनो वायरस ने थैमान घातले आहे.राज्यात ४० वरून अधिक रुग्ण पॉसिटीव्ह आढळेलेत आणखी १०० च्या वर रुग्ण संशयित आहे असे समजते.अश्या भयावह परिस्थितीशी महाराष्ट्र शासन पूर्ण ताकदीनिशी लढत आहे.महाराष्ट्र राज्यातील सर्व अनुदानित,विना अनुदानित,इंग्रजी मराठी शाळा ३१ मार्च पर्यत बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे तसेच सर्व विद्यापीठ,विद्यालय,महाविद्यालय,मॉल्स,जलतरन तलाव,सिनेमा थेटर इत्यादी अनेक गोष्टी बंद करण्याच्या आदेश शासनाने दिलेत.सार्वजनिक यात्रा,सर्व कार्यक्रमावर बंदी आणून संकट घोषित केले.व या सर्व नियमा विरोधात जर कोणी गेल्यास त्या व्यक्ती वर धारा १४४ दाखल करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.पण महाराष्ट्र राज्य मध्ये सर्वात जास्त गर्दी असणारे ठिकाण म्हणजे दारू चे दुकाने,बार इत्यादी या सर्वसामान्य ठिकानी लोकांची गर्दी ही अधिक प्रमाणात असते.कोरोना वायरस ने हाकार माजवला आहे अश्या अवस्थेत दारूदुकाने,बार चालू ठेवणे शासना साठी कोरोना रोकण्याकरिता बाधक आहे.त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील सर्व बार, दारूचे दुकाने बंद ठेवावे जेणे करून आपल्याला नोव्हेल कोरोना वायरस रोखण्यात मदत होईल. मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी व त्यांच्या संपूर्ण टीम ने कोराना वायरस चा प्रादुर्भाव रोखण्यास शर्थीचे प्रयत्न करत आहेत.मात्र ही दारूची दुकाने, बार याला बाधा ठरू शकतात अशी माहीती फुलचंद भगत यांनी प्रशासनाला दिली होती म्हणून शासनाने परिपत्रक काढून सर्व दारू दुकाने बार पुढील आदेश रेईपर्यत बंद करून कोरोना वायरस चा प्रभाव थांबावा यासाठी पावले ऊचलली आहेत.प्रशासनाच्या या निर्णयाचे भगत यांनी स्वागत केले असुन नागरिकांनीही शासनाच्या आदेशाचा सन्मान करुन सहकार्य करन्याचे आवाहन केले आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206,0763007835

No comments:

Post a Comment