तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 21 March 2020

कोरोनाचे संकट उंबरठ्यावरून परतवून लावू, जनता कर्फ्युमध्ये सहभागी व्हा - धनंजय मुंडे यांचे जिल्हावासीयांना आवाहनबीड (प्रतिनिधी) :-   कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने उद्या दि. २२ मार्च सरकारने  आवाहन केलेल्या 'जनता कर्फ्यु' मध्ये सर्व जिल्हावासीयांनी सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ६४च्या वर पोचली असताना बीड जिल्ह्यात अजूनतरी कोरोना सदृश्य रुग्ण आढळून आलेला नाही ही दिलासादायक बाब असून संभाव्य धोका मात्र नाकारता येत नाही, त्यासाठी नागरिकांनी घाबरून न जाता शासकीय सूचनांचे तंतोतंत पालन करावे असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

उद्या दि. २२ रोजी देशभरात सकाळी ७.०० ते रात्री ९.०० या वेळेत जनता कर्फ्यु पाळला जात आहे. या वेळेत आपण सर्वजण स्वयंस्फूर्त कर्फ्यु पाळून पूर्ण वेळ घरातच राहून हा जनता कर्फ्यु १००% यशस्वी करू, जेणेकरून राष्ट्रीय पातळीवर या लढाईला आणखी बळ मिळेल. धीरोदात्तपणे, संयमाने काळजीपूर्वक परिस्थिती हाताळत या संकटाला आपण परतवून लावू असेही ना. मुंडे यांनी म्हटले आहे.

उद्या (रविवारी) देशभरात हा जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन केले असून सर्व राज्यांमध्ये हा जनता कर्फ्यु तब्बल १४ तास घरात राहून पाळण्यात येणार असून जीवनावश्यक वस्तू व दवाखाने सोडता सर्व सेवा उद्या बंद राहणार आहेत.

जिल्हा वासीयांनी शासनाच्या निर्देशांचे पालन करावे, जनता कर्फ्युला पूर्ण वेळ घरी राहून १००% यशस्वी करावे तसेच या संकटाच्या काळात घाबरून न जाता आपली व आपल्या कुटुंबाची योग्य काळजी घ्यावी असे आवाहनही ना. मुंडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment