तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 21 March 2020

कोरोना विषाणूची लागण टाळण्याकरिता नागरिकांनी काळजी घ्यावी - तलाठी घोडके


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परदेशातील उत्पत्ती झालेल्या कोरोना या महाभयानक विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या झपाट्याने भारतातील सर्वच राज्यात पसरला आहे. विदेशातून भारतात परतलेल्या लोकांद्वारे भारतात सुद्धा या आजाराच्या विषाणूचा शिरकाव केला असून  जिल्ह्यात सुद्धा कोरोना विषाणूची लागण पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी कोरोना या विषाणूची लागण टाळण्यासाठी नागरिकांनी विशेष दक्षता घेउन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन हाळम सज्जाच्या तलाठी घोडके मँडम यांनी केले आहे. खोकला किंवा शिंका आल्यास नागरिकांनी तोंडावर रुमाल किंवा टिशू पेपर धरावे आणि टिशू लगेच कचरापेटीत टाकून त्याची विल्हेवाट लावावी. खोकताना किंवा शिंकताना तोंडासमोर हात धरू नये. सर्दी, खोकला, घसा दुखीचा त्रास उद्भवल्यास जवळच्या सरकारी रुग्णालयात किंवा सरकारमान्य डॉक्टरांचा सल्ला घेउन औषधोपचार घ्यावा, डॉक्टरांच्या सल्ल्याने मॉस्क किंवा स्वच्छ धुतलेला रुमाल वापरावे, गर्दीच्या ठिकाणी किंवा समारंभात जाणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment