तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 21 March 2020

सहकार्य आणि सावधगिरीची भावना अंगीभूत असल्यामुळे करोना नियंत्रित होईल ; कामगार नेते कॉ.सुधीर मुंडे याचे नागरीकांना आव्हानपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
जगभरात करोनाचा कहर वाढत आहे.शासनाच्या काही विभागात 31मार्च पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.एकीकडे भीतीचे वातावरण पसरले असून सरकार सर्वेतरी प्रयत्न करीत आहे. अशा परिस्थितीची सहकार्य आणि सावधगिरीची भावना अंगीभूत केल्यास देशात व राज्यात कोरोना नियंत्रित होईल असे आव्हान गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त तथा कामगार नेते कॉ. सुधीर मुंडे यांनी नुकतेच आव्हान नागरीकांना केले.

जगभरात थैमान घालनार्‍या करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोकण्याकरिता केंद्र सरकार व राज्य सरकार व तसेच आरोग्य प्रशासन व पोलिस प्रशासन निर्माण झालेली परिस्थिति आटोक्यात आणण्या करिता सर्वेतरी प्रयत्न करीत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी भीती बाळगू नये काम असेल तरच बाहेर पडावे.अन्यथा घरी बसूनच कामे हाताळावे आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे.अकारण प्रवास टाळावा गर्दीच्या ठिकाणी एकत्र येऊ नये. सार्वजनिक कार्यक्रम शक्यतो रद्द करावे. कान नाक डोळे यांना नेहमी स्पर्श करू नये. मास्कचा वापर करावा. सर्व आरोग्य विभागाने घालून दिलेले नियम नागरिकांनी पाळावे. तसेच वयोवृद्ध व जेष्ठ नागरिकांनी घराबाहेर जाने शक्यतो टाळावे. आपली नैतिक जबाबदारी समजून सावधगिरी बाळगल्यास लवकरच निर्माण झालेली परिस्थिति आटोक्यात येईल असे आव्हान कॉ सुधीर मुंडे यांनी अव्हान केले आहे.

No comments:

Post a Comment