तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 13 March 2020

डॉ जगदीश शिंदेंनी गरजू विद्यार्थींनीला दिला मदतीचा हात
किरण घुंबरे पाटील
पाथरी:-मजुरी करून उपजिविका करणा-या दाम्पत्याला कॅन्सर सारख्या रोगाने त्रस्त केलं. एकुलती एक मुलगी,किरायाचे घर ,घर खर्च,शिक्षणाचा खर्च दवाखाण्याचा खर्च अशा संकटांच्या चक्रव्यूहात सापडलेल्या कुटूंबाच्या मदतीला फुल नाही तर पाकळी म्हणत डॉ जगदीश शिंदे यांनी समाजसेवेचे वृत सुरू ठेवत १३ मार्च रोजी स्व नितीन महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असलेल्या पद्मजा नांदेडकर या मुलीला शिक्षणा साठी रोख अकरा हजार रुपयांची मदत दिल्याने या कुटूंबाला चांगलाच आधार मिळाला.

येथील स्व नितीन महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उदघाटना साठी शहरातील नामवंत बालरोग तज्ञ तथा नामवंत सामाजिक कार्यकर्ते डॉ जगदीश शिंदे हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.या वेळी महाविद्यालयाने गरजू होतकरू विद्यार्थ्याची निवड करावी त्या साठी आपण अकरा हजार रुपये मदत शैक्षणिक साहित्या साठी करणार असल्याची घोषणा केली होती. त्या नुसार या महाविद्यालयात कला प्रथम वर्षाला शिकत असलेल्या पद्मजा शिवदास नांदेडकर या विद्यार्थीनीची निवड महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आली. पद्मजा नांदेडकर ही विद्यार्थीनी आई वडीलांना एकुलती एक लेक.बारा वर्षा पुर्वी आई सौ सुनिता शिवदास नांदेडकर शिवदास नांदेडकर हे पाथरी शहरात कामा निमित्त स्थाई झाले.शिक्षक कॉलनीत करायाच्या घरात ते राहातात. शिवदास यांचा पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय मात्र नियतीने त्यांना आणि आता त्यांच्या पत्नी सुनिता यांना कॅन्सर ने ग्रासले असून या साठी मजुरी करून ते उपचार करुन घेत आहेत. एकुलती एक मुलगी पदवीचे शिक्षण घेत आहे. या मुलीला शिक्षणा साठी आणि आजारी आई-वडीलां साठी फुल नाही तर पाकळी म्हणून ही अकरा हजाराची मदत शुक्रवार १३ मार्च रोजी डॉ जगदीश शिंदे यांनी रोख स्वरपात लजन्मभूमी फाऊंडेशनचे सचिव किरण घुंबरे पाटील यांच्या मार्फत महाविद्यालया कडे सुपुर्द केली. ती मदत तात्काळ ग्रंथालयात पद्मजा नांदेडकर यांना डॉ शारदा पवार यांच्या हस्ते सुपुर्द केली.या वेळी ग्रंथपाल कल्याण यादव,प्रा डॉ जगन्नाथ बोचरे, प्रा डॉ सुरेश सामाले,प्रा डॉ साहेब राठोड,प्रा डॉ मारोती खेडेकर,प्रा डॉ गणपती मोरे, रमेश लिंगायत, किरण घुंबरे पाटील यांची या वेळी उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment