तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 20 March 2020

जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळून दोन दिवसीय दुकाने व आस्थापना बंदचे आदेश


परभणी दि.20:- जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी परभणी जिल्हयातील  शासकीय- निमशासकीय कार्यालये, पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणा-या आस्थापना, सर्व बँका , दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणा-या आस्थापना , रस्ते वाहतूक व रेल्वे व्यवस्था, अन्न , भाजीपाला व किराणा पुरविणा-या आस्थापना, दवाखाने , वैद्यकीय केंद्र व औषधी दुकाने, विदयुत पुरवठा , ऑईल व पेट्रोलीयम व उर्जा संसाधने, प्रसार माध्यमे , मिडिया , अत्यावश्यक सेवा देणा-या आयटी आस्थापना आदी  अत्यावश्यक सेवा वगळून जिल्हयातील सर्व आस्थापना व दुकाने दि. २१ व २२ मार्च २०२० रोजी बंद ठेवण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
        आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
पोलीस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक, परभणी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, सर्व सबंधित नगरपालिका व नगरपंचायत मुख्याधिकारी, ग्रामसेवक, तलाठी इत्यादींची असेल. तसेच आदेशाचे पालन न करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था, अथवा समूह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ तसेच भारतीय दंडसंहिता १८६० चे कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल याची दक्षता घ्यावी. असेही परभणीचे  जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दी . म . मुगळीकर यांनी आदेशात नमुद केले आहे.
                                -*-*-*-*-

No comments:

Post a Comment