तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 21 March 2020

कोरोनापासून बचावासाठी बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींनी प्रशासकीय यंत्रणेस आवश्यक माहिती निसंकोचपणे द्यावी- जिल्हाधिकारी राहुल रेखावार


बीड, (प्रतिनिधी) :-  कोरोना विषाणूचा संसर्ग (कोविड -१९)च्या उपाययोजनांमध्ये शासन पातळीवरून अधिक वाढ करण्यात येत असून या विषाणूंचा प्रादुर्भाव झालेल्या जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यासाठी गावपातळीवर अंगणवाडी सेविका आणि नगर परिषद पालिका पातळीवर संबंधित वॉर्डचे बील कलेक्टर यांना जबाबदारी देण्यात आली असून नागरिकांनी आपली माहिती निसंकोचपणे उपलब्ध करून द्यावी. त्यांची स्वतःची, परिवाराची, गावाची आणि जिल्ह्याची कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य आजारापासून सुरक्षा करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
      देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर  कोरोना विषाणूचा  संसर्ग  वाढत असून पुणे , मुंबई व राज्याच्या इतर भागात कोरोना विषाणूचा  प्रादुर्भाव झाला असून  या  जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात आलेल्या नागरिकांनी थेट गावातील ग्रामसेवक तलाठी अथवा अंगणवाडी ताईं यांच्याशी संपर्क  साधावा.  तसेच नगर परिषद हद्दीतील व शहरातील नागरिकांनी आपल्या वॉर्डातील बिल कलेक्टर यांच्याशी संपर्क साधून विचारली जाणारी माहिती उपलब्ध करून द्यावी.
     त्याचबरोबर नागरिकांनी तुमच्या गावात अथवा परिसरात बाहेरील जिल्ह्यातील ओळखीचे कुणी आले असेल तर त्यांना गावातील अंगणवाडी तांईशी  व शहरातील नागरिकांनी आपल्या वॉर्डातील बिल कलेक्टर यांच्याशी संपर्क  साधण्यास सांगावे.
   तसेच इतरत्र कुठेही न जाता घरी थांबण्याची काळजी घ्यावी. तुमची स्वतःची परिवाराची आणि गावे व शहरांची कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काळजी घ्यावी.
   प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील नागरिकांच्या कोरोना संसर्गापासून बचावासाठी उपाययोजना केल्या जात आहेत यासाठी आपले सहकार्य महत्त्वाचे असून आपणास विचारली जाणारी माहिती कोणतीही शंका मनात न ठेवता दिली जावी, असेही जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment