तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 26 March 2020

संचारबंदी शिथिलच्या काळात नागरीकांनी रस्त्यावर गर्दी करू नये - माजीमंत्री पंडितराव दौंड यांचे कळकळीचे आवाहन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
     कोरोणा विषाणूचा  प्रादुर्भाव टाळण्यासाठी संचारबंदी शिथिलच्या काळातही नागरिकांनी बँका, मोंढा मार्केटमध्ये गर्दी करू नये. स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, सर्वांनी आपापल्या घरातच थांबावे असे आवाहन माजी राज्यमंत्री पंडितराव दौंड यांनी केले आहे. 
        कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात व देशात लॉक डाऊन झाले आहे. तरी काही जण विनाकारण रस्त्यावर  फिरत आहेत, यामुळे लाॅक डाऊनच्या उद्देशाला तडा जात आहे. नागरिकांनी घरी बसून  स्वतःवर नियंत्रण ठेवावे. संचारबंदी काळात पोलीस प्रशासन घेत असलेली भूमिका योग्यच आहे. शासनाने संचारबंदी लागू केली आहे आणि सकाळी अकरा ते दुपारीे तीनच्या दरम्यान त्यात शितीलता दिली आहे. या वेळेतही नागरिक रस्त्यावर, मार्केटमध्ये अन्नधान्य व भाजीपाला खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. तसेच काही राष्ट्रीयीकृत बँकांमध्येही नागरिकांची गर्दी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यावर नागरिकांनी स्वतः आवर घालावा व गर्दी टाळावी असे आवाहन माजी राज्यमंत्री पंडितराव दौंड यांनी केले आहे. 
     कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  सरकार चांगले काम करीत आहे, सरकारच्या वतीने अन्न धान्य कमी पडणार नाही असे जाहीर केले आहे. तसेच गरजूंना कमी दरात धान्य वाटपाचा निर्णय झाला आहे. याशिवाय विविध सामाजिक संस्थेच्या वतीने गरजवंतांना घरपोच अन्नधान्य देण्यात येत आहे. या सामाजिक जबाबदारीचे स्वागतच आहे. परंतु नागरिकांनी बाजारात गर्दीे करू नये व कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ देऊ नये  असे आवाहन दौंड यांनी केले आहे. बीड जिल्ह्यात  पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक, जी. प. चे मुख्यकार्यकारी आधिकारी व त्यांचा सर्व स्टाफ ही अहोरात्र मेहनत घेत आहे असे सांगून त्यांनी चांगले काम करणाऱ्याचे कौतुक केले आहे.

No comments:

Post a Comment