तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 21 March 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य विज कामगार संघाच्या पुढाकाराने ; महावितरणच्या उपविभागातील अधिकारी व कर्मचारी, लाईनमन यांना केले मास्कचे वाटप


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- जगात कोरोनाच्या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र वीज कामगार संघाच्या वतीने परळी उपविभागीय, महावितरण कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व लाईनमन यांना वीज कामगार संघाच्या वतीने महावितरण हे अत्यावश्यक सेवेत येते कर्मचारी यांना सुरक्षा कवच म्हणून तसेच जनजागृती व्हावी म्हणून मास्कचे वाटप करण्यात आले. 
         जगभरात थैमान घालनार्‍या करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोकण्याकरिता केंद्र सरकार व राज्य सरकार व तसेच आरोग्य प्रशासन व पोलिस प्रशासन निर्माण झालेली परिस्थिति आटोक्यात आणण्या करिता सर्वेतरी प्रयत्न करीत आहे. याच पार्श्वभूमीवर महावितरणच्या सेवा देण्यासाठी आशा परिस्थितीत महावितरणही अत्यावश्यक सेवेत ही चांगल्या  प्रकारे वीज ग्राहकांना व नागरिकांना सेवा देत आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी विविध ठिकाणी अधिकारी कर्मचाऱ्यांना जावे लागते. त्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे म्हणून महाराष्ट्र वीज कामगार महासंघ यांच्या वतीने जनजागृती म्हणून संघटनेकडून हा उपक्रम राबविण्यात आला. 
     कोरोनाच्या विरोधात लढाई सुरू असताना महाराष्ट्र वीज कामगार संघाच्या पुढाकार घेऊन, अत्यावश्यक सेवा म्हणून जीवाची पर्वा न करता महावितरणचे अधिकारी-कर्मचारी परळी उपविभागातील विद्युत पुरवठा सुरूळीत ठेवण्यासाठी सज्ज झाले आहेत.तसेच करोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाकडून अधिकारी - कर्मचाऱ्यांना  'मास्क'वाटप करण्यात आले. आज सकाळी त्यांनी ही मोहीम राबवली. त्यामुळे त्यांच्या या अनोख्या समाज कार्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना विषाणूच्या आपत्ती काळात जिल्हा प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून जनजागृती आणि प्रतिबंधात्मक कारवाईच्या कार्यात प्रामाणिकपणे महाराष्ट्र वीज कामगार संघ प्रामाणिक पणे सामाजिक बांधिलकीचे काम करीत आहे. त्यामुळे असे उपक्रम कौतुकास्पद आहेत. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊच नये यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी घेतली पाहिजे तसेच कोरोना रोगाच्या प्रतिबंधासाठी २२ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लावण्यात आलेल्या "जनता कर्फ्यू" च्या पार्श्वभूमीवर या दिवशी नागरिकांनी  कर्फ्यू दिवस पाळून सहकार्य करण्याचे आवाहन संघटनेने केले आहे. यावेळी अति.कार्यकारी.अभियंता आंबाडकर साहेब,सहाय्यक अभियंता जिलानी साहेब,महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे विभागीय अध्यक्ष श्रीराम मुंडे व ईतर  अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment