तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 13 March 2020

परळीत ३ मे रोजी समर्थ प्रतिष्ठानचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा !


विद्याभूषण मुकुंदकाका जाटदेवळेकर, ज्योतिषाचार्य पं.अतुलशास्त्री भगरे गुरुजी, भागवतमर्मज्ञ बाळू महाराज उखळीकर यांची प्रमुख उपस्थिती

परळी वैजनाथ(प्रतिनिधी) :-  समर्थ प्रतिष्ठान द्वारा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्याचे प्रतीवर्षा प्रमाणे आयोजन करण्यात आले आहे.बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत होत असल्याने या सोहळ्याला अनन्य साधारण महत्व आहेच.त्या बरोबरच साधू-संतांची उपस्थिती व शिस्तबद्ध नियोजनामुळे हा उपनयन संस्कार सोहळा राज्यभरात प्रसिद्ध आहे.यंदाचा उपनयन संस्कार सोहळा विद्याभूषण मुकुंदकाका जाटदेवळेकर पाथर्डी ,ज्योतिषाचार्य पं.अतुलशास्त्री भगरे गुरुजी नाशिक,भागवतमर्मज्ञ बाळू महाराज उखळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केला गेला आहे.
         
हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे ज्या सोळा संस्कारांचा उल्लेख आहे त्यातील एक महत्त्वाचा म्हणजे उपनयन संस्कार, गत काही वर्षे नित्यनेमाने सामुदायिकरीत्या हा सोहळा समर्थ प्रतिष्ठान आयोजीत करत असते. यंदाच्या वर्षी ०३ मे २०२०, मित्ती वैशाख शु १० शके १९४२ रविवार रोजी सकाळी १० वाजून ५६  मिनीटांच्या पावन मुहूर्तावर उपनयन संस्कार वैद्यनाथ दर्शन मंडप,परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे.या उपनयन संस्कारासाठी इच्छुकांनी बाळू महाराज जोशी उखळीकर मो- ९८२३४३०७०७,राजेंद्र दगडगुंडे - ९५२७२५३३३३,नंदकुमार रामदासी- ९६८९०५६४८८, मनोज जब्दे - ९४२०७८५३३१, प्रशांत औटी- ९४२३४७२४७२ सचिन अग्निहोत्री -८२०८६८१७१०,शिरीष राजूरकर- ९४२१३३७००३, दिनेश लोंढे- ९९७५९३४७३० यांच्याकडे मोठ्या संख्येने नोंदणी करण्याचे आवाहन समर्थ प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment