तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 25 March 2020

सेलूत पेट्रोल पंप बंद वरून महसूल- पोलीस प्रशासनात जुगलबंदी■ पोलिसांनी बंद केलेले पेट्रोल पंप महसूल विभागाने केले खुले 

सेलू :प्रतिनिधी

 शहरात कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी महसूल, पोलीस व आरोग्य विभाग खडबडून जागा होत.यशस्वी भूमिका निभावत आहे. शहरात शुक्रवार ,शनिवार जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानुसार दोन दिवस बंद पाळण्यात आला. रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर शहरातील नागरिकांनी कडकडीत बंद ठेवून त्यास अभूतपूर्व प्रतिसाद दिला. कोरोना विषाणूच्या प्रसाराची जेवढी दसकी शासकीय यंत्रणेने घेतली आहे. तेवढे गांभीर्य ज्यांच्या सुरक्षेसाठी हा खटाटोप घेतला त्या जनतेने मात्र याचे गांभीर्य अद्यापिही  एकंदरीत परिस्थितीवरून दिसत नाही.म्हणून सोमवार २४ मार्च पासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. तत्पूर्वी १४४ कलम लावून जमावबंदी करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्याने संचारबंदीचे पाऊल शासनास उचलावे लागले. तरीदेखील गर्दीकरणे आणि लोकांचे फिरणे मात्र बंद झाले नाही. म्हणून रविवारी दुपारी ३वाजता शहरातील लोकांना पूर्वसूचना न देता सर्वच पेट्रोल पंप अचानक  रात्री८ वाजेपर्यंत बंद करण्यात आले.अचानक पेट्रोल बंद झाल्यामुळे रात्री ८पर्यंत पेट्रोलसाठी ग्राहकांनी  शहरातील सर्व पेट्रोल पंपावर जाऊन गर्दी करत पेट्रोल मिळण्यासाठी प्रयत्न केला. पण पेट्रोल मात्र मिळाले नाही. शहरातील लोकांनी गावाबाहेर असलेल्या पेट्रोल पंपाकडे मोर्चा वळविला आणि येथील पेट्रोल पंप बंद करण्याचा निरोप मिळेपर्यंत काहींनी धडपड करत  पेट्रोल मिळविले. एकंदरीत अचानक पेट्रोल पंप पोलिसांनी बंद केल्याची माहिती  महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना पर्यंत पोहोचली आणि एका  अधिकार्‍यांनी थेट पेट्रोल पंप गाठत दुपारी ३ पासून पोलिसांनी बंद केलेले पेट्रोल पंप रात्री८  वाजल्यापासून पूर्ववत सुरू केले. पोलीस-महसूल विभागात समन्वय नसल्याच्या या  प्रकारामुळे पेट्रोल साठी ग्राहकांची मात्र मोठी तारांबळ उडाली. उभयतांत समन्वय असला असता तर हा प्रकार घडला नसता. एकतर  पेट्रोल पंप बंद झालेच नसते आणि बंद करण्यात आलेले पेट्रोल पंप पूर्ववत सुरू करण्याची वेळ आली नसती.

■ जीवनावश्यक वस्तूचे दुकान आणि गर्दी ठरतेय प्रशासनाची डोकेदुखी

 कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करणे हा महत्त्वाचा मुद्दा जीवनावश्यक वस्तूची खरेदी मुळे ऐरणीवर पडला आहे. सकाळी दूध, पेपर, भाजीपाला आणि दिवस भर किराणा दुकान,औषध दुकान आणि पेट्रोल पंप यावरील होणाऱ्या विक्रीमुळे फिरणा-यांची संख्या वाढत आहे. आणि ही गर्दीच कोरोना विषाणूच्या प्रसारासाठी घातक ठरतआहे. कलम १४४नंतर संचारबंदी लागू केली तरी गर्दी आणि फिरणा-यांची संख्या मात्र कमी झाली नाही. हे टाळण्यासाठी विशिष्ट वेळेतच जीवनावश्यक वस्तूचे दुकान आणि पहाटे दूध ,पेपर व भाजीपाला यांना  ठराविक वेळ द्यावा म्हणजे गर्दी कमी करण्यासाठी मारहाण करण्याची वेळ उद्भवणार नाही. अशी मागणी जानकर नागरिक करत आहेत.

No comments:

Post a Comment