तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 26 March 2020

गंगाखेड चे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केली जनतेसाठी हेल्पलाइन सुरू
अरुणा शर्मापालम :- गंगाखेड चे आमदार रत्नाकराव गुट्टे यांनी सर्वसामान्य नागरिकांना कोणतीही अडचण पडल्यास ती अडचण सोडवण्यासाठी हेल्पलाइन सुरू केली असून त्या हेल्पलाइन मार्फत जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत संपूर्ण देशात कोरोना संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यामुळे जनतेने या रोगापासून कसे दूर राहावे यासाठी नागरिकांना विविध माध्यमाच्या साह्याने आव्हान केले आहे राज्यात संचारबंदी लागू केल्यामुळे सामान्य नागरिकांना अडीअडचणीला सामोरे जावे लागत आहे तसेच गावागावांमध्ये पिण्याचे पाणी, लाईट, स्वच्छता, राशन व्यवस्था याबाबत छोट्यामोठ्या तक्रारी असून त्या तक्रारीचे निरसन करण्यासाठी आमदार रत्नाकरराव गुट्टे यांनी कार्यकर्त्यांची टीम उभी केली असून त्या मार्फत गावातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत त्यामुळे नागरिकांनी जागरूक राहून अडचणी संदर्भात जिल्हाध्यक्ष संदिप अळनुरे यांचा फोन नंबर 8605884509 असून पालम पूर्णा तालुक्याचे प्रभारी माधवराव गायकवाड यांचा फोन नंबर 9423443456 असून गंगाखेड चे प्रभारी हनुमंत मुंडे यांचा फोन नंबर 9881177757 जनसंपर्क अधिकारी हनुमंत लटपटे यांचा फोन नंबर 7588109999 विठ्ठल सातपुते यांचा फोन नंबर 9607900002 यांच्याशी फोनवर संपर्क करून अडी  अडचणी सांगाव्यात असे आव्हान आमदार रत्नाकराव गुट्टे यांनी केले आहे परभणी जिल्ह्यात पहिल्यांदाच आमदाराने जनतेच्या अडीअडचणी साठी हेल्पलाईन सुरु केली असून आमदाराचे मतदारसंघात सर्वत्र कौतुक केले जात आहे.

1 comment: