तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 23 March 2020

अन साखरा येथील आठवडी बाजार भरलाच नाही! कोरोना चा धसका सर्वानी पाळला जनता कर्फ्यूसाखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 


सध्या संपूर्ण जगाला पछाडत असलेला जीव घेना आजार म्हणजे कोरोना होय या कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आज दि 21 व 22ला सर्व व्यापाऱ्यानी अाप आपली दुकाने बंद ठेऊन जनता कर्फ्यू ला चांगला प्रतिसाद मिळाला आहें ग्रामपंचायत  प्रशासनाकडून आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते त्या अनुषंगाने अन साखरा  चा आठवडी बाजार व फाट्यावरील पूर्णच दुकाने बंद होती व आठवडी बाजार भरलाच नाही.येथें फ़क्त अत्यावश्यक सेवा चालू होत्या मेडिकल दवाखाने चालू होती फ़क्त 
चीन कडून आर्य त झालेला जीव घेना संसर्गजन्य आजार कोरोना या आजाराचे संसर्गजन्य व्याप्ती थांबावी यासाठी  प्रशासनाकडून कमालीची काळजी घेतली जात आहे संपूर्ण गावागावात या आजाराविषयी जनजागृती व दवंडी दिल्या जात आहे.
शहरातून गावी आलेल्या व्यक्तींची नोंदणी करून त्यांना कोरोना आजाराविषयी लक्षणे दिसताच त्यांचे तात्काळ संशयित रुग्ण म्हणून तपासणी करण्यात येत आहे कोरोना आजारा विषयी असलेली लक्षणे सर्दी ताप खोकला श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे घसा मध्ये त्रास हलका स्वरूपाचा ताप आदी लक्षणे संबंधित रुग्णास होत असल्यास रुग्णांनी तात्काळ नजीकच्या आरोग्य साधावा व या आजाराविषयी घाबरण्याचे काहीच कारण नाही परंतु काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे प्रशासनाकडून या आजाराविषयी जनजागृती व सुरक्षितता म्हणून प्रत्येक व्यक्तीने शिकताना व खोकलताना आपल्या तोंडावर हात रुमालाचा वापर करावा आपले हात नेहमी स्वच्छ धुवावेत व हस्तांदोलन शक्यतो करू नये गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये आदी प्रकारची काळजी घेतल्यास निश्चितच कोरोना आजाराचा संसर्ग थांबविण्यास मदत होईल असे प्रशासनाकडून  नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने तालुकास्तरावरील तहसील प्रशासनाकडून व ग्रामपंचायत  प्रशासनाकडून आज साखरा येथील  अतिशय मोठा व प्रसिद्ध असलेला आठवडी बाजार कोरोला संसर्गजन्य थांबावा यासाठी हा बाजार भरवण्यात प्रतिबंध करण्यात आला होता आज सकाळ पासून कोनी घरच्या बाहेर निघालेच नाहीत सर्व बाजार पेठेत शुकशुकाट पहायला मिळाले 

तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a Comment