तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 21 March 2020

प्रधानमंत्री मोदी यांच्या आवाहनास साथ देऊन शहरात 'जनता कर्फ्यू'चे अनुसरण करुया - मुख्याधिकारी मुंडे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला साथ देण्यासाठी परळी शहरातील सर्व नागरीकांनी 'जनता कर्फ्यू'चे अनुसरण करत रविवार 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9  या वेळेत घराबाहेर पडू नये असे आवाहन परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी केले आहे. 
       कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना घरी राहून संयम बाळगण्याचे आणि कोरोना व्हायरस या जीवघेण्या आजाराला शक्य तेवढे पुढे पाऊल  टाकू न देण्याचे आवाहन केले. यासाठी पंतप्रधानांनी उद्या रविवार दि. 22 मार्च रोजी सकाळी 7 ते नऊ या वेळेत सर्व नागरिकांना 'जनता कर्फ्यू'चे अनुसरण करण्याचे आवाहन केले आहे. या जागतिक संकटावर मात करण्याचा संकल्प करून नागरिक म्हणून आपली सर्व कर्तव्ये पार पाडणे आणि केंद्र आणि राज्य सरकारांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करणे. आज आपण सर्वांनी स्वतःला संसर्ग होऊ नये आणि इतरांनाही संसर्ग होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपणा सर्वांनी पुढील काही आठवड्यांसाठी घरातून बाहेर जावू नये. सर्वांनी  गर्दीपासून, समाजातील इतर लोकांपासून स्वत:ला वेगळे ठेवले पाहिजे. म्हणुनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9  या वेळेत सर्व नागरिकांना 'जनता कर्फ्यू'चे अनुसरण करण्याचे आवाहन केले असुन शहरातील नागरिकांनी जनता कर्फ्यू'चे अनुसरण करण्याचे आवाहन अरविंद मुंडे यांनी केले.

No comments:

Post a Comment