तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 21 March 2020

परळीत लॉकडाऊन - प्रशासनाने रस्त्यावर गर्दी कमी करण्यासाठी केले जनतेला आवाहनपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-दि.20 - कोरोना व्हायरसचा संसर्ग रोकण्यासाठी प्रशासन सतर्क आहे.राज्यभरात विविध उपाययोजना केल्या जात आहेत.उद्या संपूर्ण भारतात जनता करफ्यु चे आवाहन करण्यात आले आहे.तर शनिवार रोजी अत्यावश्यक सोडता संपूर्ण दुकाने आणि संस्था बंद ठेवण्याचे आवाहन बीड चे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले होते.अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व व्यवहार बंद असल्याचे दिसून आले.

या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर परळीत संपूर्ण प्रशासन रस्त्यावर दिसून आले.यावेळी त्यांनी  नागरिकांना अतिमहत्वाच्या कामासाठीच बाहेर पडावे अशा सूचना करण्यात आल्या.मंदिर परिसरात न.प.मुख्याधिकारी अरविंद मुंडे,तहसीलदार डॉ.विपिन पाटील,वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट चे सचिव राजेश देशमुख यांनी मंदिर परिसरात गर्दी न करण्याचे आवाहन केले.दरम्यान संपूर्ण शहरात पोलीस प्रशासन  नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले गेले. कमीत कमी गर्दी कशी होईल यासाठी प्रशासन सकाळपासूनच सक्रिय झाले होते.

No comments:

Post a Comment