तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 26 March 2020

राधा-मोहन साथी प्रतिष्ठान व स्व.मोहनलालजी बियाणी अन्नछत्रच्या वतीने गरजूंना जेवण डब्यांचे वाटप दै.मराठवाडा साथी जनजागृती मोहीमे अंतर्गत उपक्रम

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
कोरोना आजाराचा प्रसार थांबावा यासाठी सर्वत्र कर्फ्यु लावण्यात आला आहे. अशा कठीण परिस्थितीत कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी, चेकपोस्टवर असलेले शिक्षक व अनेक विभागांचे कर्मचारी तसेच गरजू आणि निराश्रीत लोकांना गुरूवारी दै.मराठवाडा साथी जनजागृती उपक्रमाच्या अंतर्गत राधा-मोहन साथी प्रतिष्ठान व स्व.मोहनलालजी बियाणी अन्नछत्र यांच्या वतीने तयार जेवण डब्बे व शुध्द व फिल्टर्ड पाण्याच्या बाटल्या पोहच करण्यात आले.
देशात लावण्यात आलेल्या कर्फ्युमुळे अनेकांच्या जेवणाची आभाळ होत आहे. ज्यामध्ये नागरीकांच्या सेवेत तत्पर असलेले विविध प्रशासकीय विभागांचे कर्मचारी तसेच मंदीर आणि रस्त्यांवर असलेले निराधार निराश्रीत लोकांच्या जेवणाच्या सोयीसाठी राधा-मोहन साथी प्रतिष्ठान आणि स्व.मोहनलालजी बियाणी अन्नछत्र यांच्या वतीने तयार जेवणाचे डब्बे व शुध्द व फिल्टर्ड पाण्याच्या बाटल्या पोहच करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली दै.मराठवाडा साथी जनजागृती मोहीमे अंतर्गत हा उपक्रम शहराच्या विविध भागांत राबविण्यात आला. चौकीवर व चेकपोस्टवर असलेले कर्मचारी, वैद्यनाथ मंदीर समोरील भिक्षुक, तसेच रस्त्या रस्त्यावर दिसून येणाऱ्या निराश्रीत लोकांना तयार जेवणाचे डब्बे आहेत त्या ठिकाणी कर्फ्यु शिथीलतेच्या काळात पोहच करून देण्यात आले.

No comments:

Post a Comment