तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 24 March 2020

कोरोणा व्हायरसच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हा रुग्णालय सतर्क; तपासणी आणि उपचारासाठी स्वतंत्र कक्ष; वैद्यकीय पथक तैनात-डाॅ रामेश्वर लटपटेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-राज्यात कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहता परळी शहरातून विदेशात आणि बाहेरगावाहून येणाऱ्या संशयित रुग्णांच्या तपासासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र आयसुलेशन कक्षाची स्थापना करण्यात आली असून यामध्ये सात डॉक्टर सह एक पथक तैनात करण्यात आलेले आहे. नागरिकांनी ह्या व्हायरसच्या आफवेस बळी न पडता वेळोवेळी आरोग्य विभागाकडून दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा प्रसिद्ध जनरल सर्जन रामेश्वर लटपटे यांनी केले आहे.
       देशामध्ये तसेच राज्यामध्ये कोरोना वायरस दिवसेंदिवस प्रभाव वाढताना दिसत आहे. याबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या व्हायरसमुळे भयभीत होऊन परळी शहरातून रोजगारासाठी किंवा नोकरी कामी अनेक नागरिक मुंबई - पुणे आदी महत्त्वाच्या शहराबरोबरच विदेशातही गेलेले आहेत. मात्र या व्हायरसचा वाढता  प्रभाव पाहता परळी शहरातून गेलेले नागरिक आपल्या कुटुंबासह सध्या परळी शहरांमध्ये मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. परळी शहरांमध्ये कोरोना व्हायरसचा एकही रुग्ण आढळलेला नाही
 मात्र बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची उपजिल्हा रुग्णालयात काटेकोर तपासणी करण्यात येत आहे. आजतागायत विदेशातून आणि परगावाहून परळी शहर आणि ग्रामीण भागात आलेल्या चौघांची या ठिकाणी तपासणी करण्यात आली मात्र त्यांच्यामध्दे कोणत्याही प्रकारचे लक्षण  दिसून आले नाही. त्यामुळे त्यांना आपापल्या घरी सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आले असून त्यांच्यावर आमच्या रूग्नालया मार्फत वेळोवेळी तपासणी करण्यात येत आहे. त्यांचेवर आमचे पूर्णतः लक्ष आहे असेही वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रामेश्वर लटपटे यांनी सांगितले.        सध्या खबरदारीचा उपाय म्हणून उपजिल्हा रुग्णालय परळी या ठिकाणी स्वतंत्र आयसोलेशन कक्षाची स्थापना करण्यात आली असून याठिकाणी 30 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. ह्या कक्षा मध्ये व्हेंटिलेटर ची सोय करण्यात आलेली असून याठिकाणी सात डॉक्टर पाच नर्सेस आणि तीन कर्मचारी अशा पंधरा जणांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे पथक सदर कक्षामध्ये 24 तास कार्यरत राहणार आहे.
     नागरिकांनी सदर व्हायरस ची लागण होऊ नये यासाठी दोघांमध्ये तीन ते चार फुटाचे अंतर ठेवावे आणि नाकाला, तोंडाला, कानाला वेळोवेळी हाताचा  स्पर्श करू नये तसेच नेहमीच हात स्वच्छ धुवावे सॅनिटायझर चा वापर करावा व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि काहीही झाले तरी नागरिकांनी कोणत्याही आफवेस बळी पडू नये  उपजिल्हा रुग्णालय प्रत्येक बाबतीत नेहमीच सतर्क आहे असेही आवाहन वैद्यकीय अधीक्षक तथा प्रसिद्ध जनरल सर्जन डॉक्टर रामेश्वर लटपटे यांनी केले आहे.
------------------
    
   "233 तपासण्या"
----------------
राज्यात कोरोना व्हायरस वाढता प्रभाव पाहता पुणे मुंबई आणि बाहेरून परळी शहरात दाखल झालेल्या जवळपास 233 पुरुष व महिलांची उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आलेली आहे. यामध्ये काल 222 तर आज 11 तपासण्या करण्यात आल्या. यापैकी कोणासही सदरची लक्षण आढळून आले नसल्यामुळे त्यांना तपासणीअंती घरी पाठवण्यात आले. तसेच अद्यापही बाहेरगावाहून येणार्‍यांची तपासणी सुरूच  असल्याची माहितीही वैद्यकीय अधीक्षक डॉ रामेश्वर लटपटे यांनी दिली.

No comments:

Post a Comment