तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 23 March 2020

परळीत विदेशातुन आलेल्या दोघांची प्रशासनाकडुन तपासणी


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
मागील काही दिवसात विदेशातुन आलेल्या दोघांची परळीचे तहसिलदार यांनी वैद्यकिय पथक घेवुन तपासणी केली.त्या दोघातही कोरोणाचे लक्षण नसल्याने त्यांना घरीच राहण्याच्या व काळजी घेण्याच्या सुचना दिल्या.तसेच तहसिलदारांनी उपजिल्हा रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या आयसुलेशन कक्षाची पहाणी केली.
 कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर परळीत प्रशासनाच्या वतिने सतर्कता बाळगण्यासाठी आवाहन करण्यात येत असुन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.आज दि.23 रोजी तहसिलदार विपीन पाटिल,न.प.मुख्याधिकारी अरविंद मुंडे,नायब तहसिलदार बाबुराव रुपनर,तलाठी राजुरे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ परमेश्वर लटपटे,पो.शि.समाधान भाजीभाकरे यांच्या पथकाने काही दिवसांपूर्वी विदेशातुन परळीत आलेल्या दोघांच्या घरी भेट देवुन तपासणी केली.ते दोघेही कोरोना निगेटिव्ह असुन त्यांनी घरातच इतर सदस्यांच्या अंतराने रहावे व काळजी घ्यावी अशा सुचना दिल्या.या पथकाने उपजिल्हा रुग्णालयात  कोरोना संशयीतांच्या तपासणीसाठी सुरु करण्यात आलेल्या आयसुलेशन कक्षाची पहाणी केली.

No comments:

Post a Comment